छत्रपती शिवाजी हायस्कूलचे शिक्षक कुरुलकर यांचा प्रामाणिकपणा ;महिलेला मोबाईल, पैस केले परत

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

वैराग , धाराशिव: येथे मुलाच्या शाळेला सुट्ट्या लागल्या म्हणून रिक्षातून गावाकडे जाणाऱ्या महिलेची मोबाईलसह पर्स रस्त्यात गहाळ झाली होती. पण ती पर्स विद्यार्थ्यांना घडवत ज्ञान देणाऱ्या प्रामाणिक शिक्षकाला सापडली तेव्हा मोबाईल व पर्स ज्याची होती त्याला त्यांनी सुखरूप परत केली. छत्रपती शिवाजी हायस्कूल येथील सहशिक्षक आण्णासाहेब कुरुलकर असे त्या शिक्षकाचे नाव असून सर्व स्तरांतून त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे.

सध्या आपले ते आपलेच, पण दुसऱ्याचे पण आपले ! असे वागणारे लोक पहायला मिळतात. तर त्याहीपुढे मग एखादयाची सापडलेली वस्तू त्यास कोण परत देणार ? अशा प्रामाणिकपणे वस्तू परत करणाऱ्या लोकांची संख्या समाजात कमी पहायला मिळते. सर्वत्र दिवाळीची धामधूम सर्वत्र सुरू आहे. बाजारहाट व गावाकडं जाणे निमित्त प्रवास जाणाऱ्या लोकांची संख्या वाढली आहे. त्यातच मुलांच्या शाळांना सुट्या लागल्याने शाळेसाठी धाराशिव शहरात रुम करून राहिलेले विद्यार्थी – पालक दिवाळीसाठी गावाकडे जात आहेत. असेच अपसिंगा ( ता. तुळजापूर ) या ठिकाणची महिला सौ. अपसिंगकर या धाराशिव शहरातून गावाकडे जाण्यासाठी रिक्षा करून बस स्टॅडला निघाली होती. बार्शी नाका ते आर. पी. कॉलेज दरम्यान सदर महिलेची पर्स गहाळ झाली होती. छत्रपती शिवाजी हायस्कूलचे सहशिक्षक आण्णासाहेब कुरुलकर हे शाळेकडे चालले होते. तेव्हा रस्त्यात पडलेली पर्स त्यांना दिसली. पर्स पाहिली असता त्यात मोबाईल व पैसे असल्याचे आढळून आले. तेव्हा आजू बाजूला त्यांनी चौकशी केली. परंतु शोध लागला नाही. काही वेळानंतर सदर पर्स मधील मोबाईलवर महिलेच्या पतीचा फोन आल्यानंतर सदर मोबाईल व पर्स सापडली असून सुखरूप आहे. आपण घेऊन जावे असे त्यांना कळवले. त्यानंतर काही वेळाने सदर महिलेशी पतीचा संपर्क झाल्याने त्यांची पर्स, रक्कम व मोबाईल त्यांना परत करण्यात आली. तेव्हा सदर महिलेने व प्रशालेतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी सहशिक्षक आण्णासाहेब कुरुलकर यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या