राजर्षी शाहू महाराजांच्या समाधी स्थळाचे स्मारक करणे हा राज्य सरकारचा संकल्प – चंद्रकांत पाटील
B1न्यूज मराठी नेटवर्क
कोल्हापूर : आज राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लोकराजा राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मस्थळी जाऊन महाराजांना अभिवादन केले. त्यानंतर कोल्हापुरातील नर्सरी बागेतील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधी स्मारक सुशोभिकरणाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांचे भूमिपूजन कार्यक्रमास त्यांनी उपस्थिती लावली.
यावेळी राजर्षी शाहू महाराजांच्या समाधी स्थळाचे स्मारक करणे हा राज्य सरकारचा संकल्प असल्याचे सांगितले. तब्बल ९ कोटी ४० लाख रुपयांच्या निधीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचे नुतनीकरण, तसेच राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनावरील कलादालन, परिसरातील लॅंडस्केपिंग, संरक्षक भिंत, पादचारी मार्ग, वाहनतळ, समाधीवास्तूंची दुरूस्ती, विद्युतीकरण आदी कामे केली जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
यावेळी या वेळी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खा. धनंजय महाडिक, आ. प्रकाश आवाडे, आ. सतेज पाटील, आ. ऋतुराज पाटील, आ. जयश्री जाधव, आम. जयंत आसगावकर, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार, भाजप जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, वीरेंद्र मंडलिक, विविध शासकीय पदाधिकारी, वेगवेगळ्या शाळांमधून आलेले विद्यार्थी, शिक्षक व तमाम शाहूप्रेमी नागरिक उपस्थित होती.