ई वेस्ट कचरा संकलनासाठीच्या ॲटो टिप्परचेपालकमंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते लोकार्पण

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

कोल्हापूर : महापालिकेच्या ऑटो टिप्पर गाड्यांमधे थोडा बदल करुन त्यामध्ये घरगुती घातक कचरा, घरगुती सॅनिटरी कचरा आणि ई वेस्ट संकलन करण्यासाठी स्वतंत्र कप्पे तयार करण्यात आले आहेत. या ॲटो टिप्परचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते झाला. हा कार्यक्रम आरटीओ ऑफिस रोड, पितळी गणपती या ठिकाणी घेण्यात आला. यावेळी प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, उप-आयुक्त रविकांत आडसूळ, आरोग्याधिकारी डॉ.रमेश जाधव, सहायक आयुक्त डॉ.विजय पाटील, माजी नगरसेवक सत्यजित कदम, निलेश देसाई, अजित ठाणेकर, वैभव माने आदी उपस्थित होते.


महानगरपालिका अंतर्गत घरगुती कचरा उचलण्यासाठी 169 ऑटो टिपर मार्फत व्यवस्था करण्यात आली आहे. कंटेनर मुक्त कोल्हापूरची संकल्पना राबवत असताना मागील दोन वर्षांमध्ये 1 हजार पेक्षा अधिक असलेले कंटेनर काढून प्रत्येक घराबाहेर जाऊन कचरा संकलनाची व्यवस्था महापालिकेच्यावतीने करण्यात आली आहे. या ऑटो टीपरद्वारे घरगुती ओला व सुका कचरा वर्गीकरण करुन त्याचे संकलन व प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्पावर दैनंदिन नेण्यात येतो. यामध्ये बऱ्याच वेळा सॅनिटरी वेस्ट, घरगुती घातक कचरा या कचऱ्यामधून एकत्र येतो. त्यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टिकोनातून प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या संकल्पनेतून इंदोर पॅटर्नच्या धर्तीवर महानगरपालिकेमधील ऑटो टिप्पर गाड्यांमध्ये थोडा फार बदल करुन त्यावर घरगुती घातक कचरा, घरगुती सॅनिटरी कचरा आणि ई वेस्ट संकलन करण्यासाठी प्रत्येक गाडीच्या मागे स्वतंत्र कप्पे तयार करण्यात आले आहेत. या प्रत्येक कप्प्याला वेगवेगळ्या रंगाचे कलर कोड देण्यात आले आहेत.


हे मॉडिफिकेशनचे काम कळंबा जेल मार्फत करण्यात आले असून महानगरपालिकेने निधी खर्च केलेला आहे. घरगुती घातक कचरा जसे ट्यूबलाईट, बल्ब, पेस्टिसाइड, रंगाचे डबे,बॅटरी सेल, डोमेस्टिक सॅनिटरी वेस्ट जसे सॅनिटरी नॅपकिन, डायपर, मेडिसिन, ग्लोज, मास्क आणि ई वेस्ट जसे जुने कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक वस्तू ,खराब मोबाईल, खेळणी, इलेक्ट्रॉनिक्स इत्यादी यांचे वर्गीकरण करुन त्याचे स्वतंत्रपणे संकलन केले जाणार आहे या संकलन केलेल्या कचऱ्यावर स्वतंत्र प्रक्रिया केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी या कचऱ्याचे वर्गीकरण करुन महानगरपालिकेच्या ऑटो टिप्पर गाडीमध्ये स्वतंत्रपणे देण्याचे आवाहन कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने उपायुक्त रविकांत आडसुळ यांनी केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या