रासायनिक खताच्या किंमती जाहिर पक्के बिल घेऊनच खरेदी करावे कृषी विभागाचे आवाहन
B1न्यूज मराठी नेटवर्क
वाशिम : रासायनिक खताच्या किंमती कमी झाल्याच्या बातम्या मागील दोन दिवसांपासून जिल्हयातील समाज माध्यमात व्हायरल होत आहे. त्यामुळे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकरी बांधवांमध्ये रासायनिक खतांच्या किंमतीबाबत संभ्रम निर्माण होऊ शकतो. अद्याप रासायनिक खताच्या किंमती कमी झाल्याची अधिकृत माहिती आलेली नाही. तरी जिल्हयातील शेतकरी बांधवांनी बियाणे, खते व किटकनाशके खरेदी करतांना परवानाधारक दुकानामधूनच पक्के बिल घेऊनच खरेदी करावी. असे आवाहन जिल्हा परिषदेचे प्रभारी कृषी विकास अधिकारी गणेश गिरी यांनी केले आहे.
रासायनिक खताच्या किंमती सन 2023-24 करीता खतनिहाय पुढीलप्रमाणे आहे. डीएपी 18:46:00- 1350 रुपये प्रती बॅग, एमओपी 00:60:0- 17 रुपये बॅग, एमपी 24:24:0:0- 1500 रुपये ते 1700 रुपये, एनपीएस 24:24:00:8- 1500 रुपये, एनपीएस 20:20:0:13- 1200 रुपये ते 1300 रुपये, एनपीके 19:19:19- 1550 रुपये, एनपीके 10:26:26:0- 1470 रुपये, एनपीके 12:32:16- 1470 रुपये, एनपीके 14:35:14- 1500 रुपये, एनपी 14:28:00- 1650 रुपये ते 1700 रुपये, एनपी 20:20:00- 1175 रुपये, एनपीके 15:15:15- 1470 रुपये, एनपीएस 16:20:0:13- 1150 रुपये ते 1470 रुपये, एनपीके 16:16:16:0- 1250 रुपये, एनपी 28:28:0:0- 1500 रुपये, एएस 20:5:0:0:23- 1000 रुपये, एनपीकेएस 15:15:15:09- 1450 रुपये 1470 रुपये, एनपीके 17:17:17- 1210 रुपये, एनपीके 08:21:21- 1750 रुपये, एनपीके 09:24:24- 1790 रुपये, एसएसपी 0:16:0:11- 490 रुपये ते 570 रुपये आणि एसएसपी 0:16:0:12- 450 रुपये ते 530 रुपये असे आहे. तरी जिल्हयातील शेतकऱ्यांनी वरील दराप्रमाणे खताची खरेदी करावी. रासायनिक खताच्या दराबाबत कोणताही संभ्रम ठेवू नये.