शासकीय तंत्रनिकेतनमध्ये कॅम्पस भरतीतून ४३ जणांची निवड

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

वाशिम : शासकीय तंत्रनिकेतन वाशिम या संस्थेमध्ये शैक्षणिक वर्ष २०२२- २३ करिता अंतिम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता कॅम्पस रेकृटमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शासकीय तंत्र निकेतन वाशिम येथील ७२ पैकी एकूण ४३ जणांची देशतील अग्रगण्य व नामांकित जॉन डियर कंपनीमध्ये नोकरीसाठी निवड करण्यात आली आहे.


शासकीय तंत्रनिकेतन वाशिम येथे एकूण सहा शाखा असून यामध्ये उद्योगधंद्यांना उपयुक्त असे रोजगारक्षम विद्यार्थी घडवून त्यांना नोकरीच्या किंवा व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात.यावर्षी संस्थेचे प्राचार्य डॉ. बी. जी. गवलवाड व टीपीओ यु. आर. तोष्णीवाल यांच्या प्रयत्नामुळे विद्यार्थ्यांकरिता कॅम्पस भरतीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये भारतातील अग्रगण्य व नामांकित कंपनी जान डियर मार्फत कॅम्पस रिकृटमेंट प्रकिया राबवली यामध्ये ऑटोमोबाईल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स ऍण्ड टेलिकम्युनिकेशन , इलेक्ट्रिकल व माहिती तंत्रज्ञान शाखेतील अंतिम वर्षात शिकणाऱ्या पात्र विद्यार्थ्यानी सहभाग घेतला.


परीक्षा घेऊन मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची संभाषण कौशल्य गुणवत्ता व प्रात्यक्षिक कौशल्य यावर आधारित एकूण ४३ जणांची निवड करण्यात आली.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी मानधनासोबत मेडिक्लेम,गृप एक्सीडेंट पॉलिसी व कॅन्टीन सुविधा देण्यात आली आहे.संस्थेचे प्राचार्य डॉ. बी.जी.गवलवाड सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या