महाराष्ट्रयोजनावाशिम

शबरी महामंडळातर्फे कर्ज योजनेसाठी ऑनलाइन अर्ज आमंत्रित

B1न्यूज मराठी नेटवर्क

वाशिम : शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळातर्फे कर्ज योजनेसाठी ऑनलाइन अर्ज आमंत्रित आहेत. वाशिम जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी ९ योजनांतर्गत कर्ज उपलब्ध आहे.

महिला सबलीकरण योजनेसाठी २ लाख रुपये, कृषी आणि संलग्न व्यवसायासाठी ५ लाख रुपये, हॉटेल ढाबा व्यवसायासाठी ५ लाख रुपये, ऑटो वर्कशॉप, स्पेअर पार्टसाठी ५ लाख रुपये, वाहन व्यवसायासाठी १० लाख व १०-१५ लाख रुपये, लघु उद्योग व्यवसायासाठी ३ लाख रुपये, ऑटो रिक्षा, मालवाहू रिक्षासाठी ३ लाख रुपये, स्वयम साहयता बचत गटासाठी ५ लाख रुपये इत्यादी योजना राबविण्यात येत आहे.

तरी या योजनेकरीता लाभार्थ्यांनी www.mahashabari.in या वेबसाईड वर दि. २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्यात यावे. तसेच काही अडचण असल्यास कार्यालयाच्या ९४२२९४५५१० किंवा ०७२३२- २५३१६९ या नंबरवर संपर्क साधावा असे शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळातर्फे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button