राज्य उत्पादन शुल्क विभागाची तेर येथे मोठी कारवाई6 लाखांपेक्षा जास्त किंमतीचा अवैध दारुसाठा जप्त

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

उस्मानाबाद : महाराष्ट्र राज्याच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्या आदेशान्वये महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क्‍ मुंबईचे संचालक सुनिल चव्हाण, औरंगाबादचे विभागीय उप-आयुक्त औरंगाबाद पी. एच. पवार आणि उस्मानाबादचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश बारगजे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अवैध महा किंवा मद्यार्क, मळी आयात, निर्यात, वाहतूक व विक्री करणाऱ्यांवर महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 अंतर्गत कार्यवाही करुन गुन्हे नोंदविण्याची मोहिम चालू आहे.

गत दोन महिन्यापासून जिल्ह्यात विविध ठिकाणी सामुहीक थाड सत्र आयोजित करुन अवैध मद्य निर्मीती केंद्रावर कार्यवाही करण्यात येत आहे. जिल्ह्यातील अधिकारी सतर्क राहून या मोहिमेत भरीव कामगिरी करीत आहेत. यातच दि. 26 एप्रिल 2023 रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार उस्मानाबाद तालुक्यातील तेर मौजे गोरोबाकाका चौक पारधीवस्ती येथील विजय विश्वंभर काळे, वय-20 वर्षे व बसस्टॅण्ड समोर त्याच्या राहत्या घरात अवैधरित्या गोवा राज्य निर्मित उत्पादन शुल्क चुकविलेले विदेशी दारुची विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगून असल्याची खात्रीलायक बातमी मीळाली. त्यानुसार उस्मानाबाद राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश बारगजे, दुय्यम निरीक्षक व्ही. पी. राठोड, स.दु.नि. अमर कोरे, एम. पी. कंकाळ, आर. आर. गिरी, विशाल चव्हाण, विनोद हजारे, अनिल कोळी, बालाजी भंडारे, कोंडीबा देशमुखे, अभिजीत बोंगाणे, सुरेश वाघमोडे, तुषार नेर्लेकर, अविनाश गवंडी, ऐजाज शेख आणि जवान अनिल सोनकांबळे यांच्यासह गुप्त माहिती मिळालेल्या मोजे तेर येथील बसस्टॅण्ड समोर त्याच्या राहत्या घरात पारधीवस्ती गोरोबाकाका चौक येथे छापा मारला असता आरोपी विजय विश्वंभर काळे यांच्या ताब्यातून एकूण 6 लाख 32 हजार 60 रुपये किंमतीचा गोवा राज्य निर्मित उत्पादन शुल्क चुकविलेले विदेशी दारुची मद्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


जप्त मुद्देमालात रॉयल ब्ल्यु व्हिस्की 180 मि.ली. क्षमतेच्या एकूण 2 हजार 976 बाटल्या (गोवा राज्य निर्मीत) एकूण किंमत 4 लाख 1 हजार 760 रुपये, अॅडरेल क्लासीक व्हिस्कीच्या 750 मि.ली. क्षमतेच्या 204 बाटल्या (गोवा राज्य निर्मीत) एकूण किंमत एक लाख 6 हजार 80 रुपये, गोल्डन अेस ब्ल्यु फाईन व्हिस्की 750 मि.ली. क्षमतेच्या 72 बाटल्या (गोवा राज्य निर्मीत) एकूण किंमत 37 हजार 440 रुपये, आयबी 180 मि.ली. च्या 192 बाटल्या (गोवा राज्य निर्मीत) एकूण किंमत 30 हजार 720 रुपये, देशी दारु टँगो पंच 180 मी.ली. च्या 768 बाटल्या एकूण किंमत 53 हजार 760 रुपये, मॅकडॉल व्हिस्कीचे बनावट बुच एकूण 600 ज्याची एकूण किंमत एक हजार 800 रुपये, आयबी व्हिस्कीचे बनावट बुच एकूण 100 ज्यांची एकूण किंमत 500 रुपये असा एकूण 6 लाख 32 हजार 60 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


या गुन्हयात पकडण्यात आलेला आरोपी आणि इतर यांच्याविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 65(ड) (ई),80(1),81 8390 व 108 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदरचा मद्यसाठा तो कोणला विक्री करणार याचा तपास केला जात आहे.


About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या