पत्रकार धीरज शेळके यांचा ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते युवा भूषण म्हणून सन्मान
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : येथील प्रबुद्ध चॅरिटेबल ट्रस्ट, पुरोगामी विचार मंच, नालंदा बुद्ध विहार, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचनालय, नालंदा स्तूप बुद्धिझम अँड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटर आणि सहारा ग्रुपच्या वतीने संविधान बचाव देश बचाव चा नारा लावत महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ज्येष्ठ साहित्यिक तथा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांचे भारतीय संविधान आणि लोकशाहीचे भवितव्य या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले व संविधानामधील उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून आयोजक संघटनांच्या वतीने महाराष्ट्रामध्ये विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सहा व्यक्तींचा गौरव उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये विशेष करून अखिल भारतीय छावा संघटनेचे बार्शी तालुका अध्यक्ष तथा हिंदवी समाचार चे मुख्य संपादक धिरज शेळके यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेऊन, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते युवा भूषण म्हणून सन्मानचिन्ह, शॉल व पुष्प देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवी डॉ. कृष्णा मस्तुद तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रागीताने करण्यात आली.