विविध क्षेत्रातील ११ जणांची युगदर्शक आयकॉन पुरस्कारासाठी निवड,२९ एप्रिल रोजी बार्शीत होणार वितरण,

0

पुरस्कार सन्मान सोहळ्याची दहा वर्षांची अखंड परंपरा

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : येथून वितरित होणारा युगदर्शक आयकॉन पुरस्कार सोहळा यंदा दहाव्या वर्षात पदार्पण करीत असून हा कार्यक्रम शनिवारी दि. २९ एप्रिल रोजी स्व. यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक भवन येथे सायं. सहा वाजता होत आहे. निवड समितीकडून विविध क्षेत्रातील ११ जणांची निवड करण्यात आली • असून मानाचा फेटा, शाल, पुष्पगुच्छ, स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून सुप्रसिध्द ज्योतिषतज्ञ, आनंदी वास्तूचे प्रमुख आनंद पिंपळकर, धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर, सावता परिषद संस्थापक अध्यक्ष काकासाहेब आखाडे, पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, ज्येष्ठ संपादक संतोष सूर्यवंशी, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री दिलीप सोपल यांची प्रमुख उपस्थिती असणार असल्याची माहिती युगदर्शक आयकॉन सोहळ्याचे प्रमुख विश्वस्त नितीन भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सन २०२३ सालच्या दशकपूर्तीच्या या कार्यक्रम सोहळ्यात बार्शी व राज्यस्तरावर अशा एकूण ११ आयकॉन पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. यातील बार्शी आयकॉनसाठी ओंकार एकशिंगे (युवा), अॅड. प्रशांत एडके (विधी), डॉ. प्रमोद जाधवर (वैद्यकीय), राहुल कोंढारे (उद्योग), मल्लिकार्जुन धारुरकर (पत्रकार), राज्यस्तरीय आयकॉनसाठी दीपक रांगे (सरपंच), सुरेश शेळके (समाजसेवा), तहसीलदार सौदागर तांदळे (महसूल), नितीन मुंडे (पोलीस), रामराजे गोरे (कृषि), शिल्पा शेटे (महिला) या मान्यवरांची निवड करण्यात आली असून त्यांना यंदाचा युगदर्शक आयकॉन पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे आनंद पिंपळकर हे माणसांचे स्वभाव व गमती जमती या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तरी या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन नितीन भोसले यांनी केले आहे. यावेळी कौस्तुभ (आण्णा) पेठकर, संजय (आबा) बारबोले, दिनेश नाळे, विशाल नवले, अजित बोरकर, संदीप आगलावे, शितल नाळे, हेमंत रामगुडे, शिरीष नाळे, पोलीस पाटील महेंद्र पाटील, उदय पोतदार, गणेश शिंदे, पंडित शिंदे, सिद्धू देवकर, सुरज हुंबे, सुरज मुल्ला, परसू साळुंखे, गजानन साखरे, नितीन जाधवर, दशरथ अनुसे, यशवंत माने, सर्जेराव कदम व इतर आयकॉन विश्वस्त उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या