वंचित, वैदु, भटक्या विमुक्त समाजाच्या न्याय हक्कांसाठी, त्यांच्या पाठीशी काँग्रेस पक्ष खंबीरपणे उभा आहे. : सुशीलकुमार शिंदे

0

भवानी पेठ वैदु वस्ती येथे राजेंद्र शिरकुल, विवेक कन्ना आयोजित जय भारत सत्याग्रह जाहिर सभा संपन्न

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापुर : शहर काँग्रेस कमिटी वतीने माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे, शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, ब्लॉक अध्यक्ष उदय चाकोते, महाराष्ट्र सेवादल यंग ब्रिगेड अध्यक्ष सुदीप चाकोते, वरिष्ठ उपाध्यक्ष सुनील रसाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत, सोलापुर उत्तर विधानसभा युवक काँग्रेस सचिव संयोजक राजेंद्र शिरकुल, सोलापुर शहर युवक काँग्रेस उपाध्यक्ष संयोजक विवेक कन्ना भवानी पेठ वैदु वस्ती येथे महागाई, बेरोजगारी, मा. राहुलजी गांधी यांच्यावरिल कारवाई, अदानींचा भ्रष्टाचार, सोलापुरचा पाणी प्रश्न आदि विषयांवर “जय भारत सत्याग्रह, जाहिर सभा आयोजित केली होती या जाहिर सभेस जवळपास एक हजार नागरिक बंधु भगिनी उपस्थित होते.

या कार्यक्रमात सुशीलकुमार शिंदे आणि काँग्रेस पक्षाने सोलापुरच्या विकासासाठी केलेल्या कार्याचे चित्रफ़ित LED स्क्रीनवर दाखविण्यात आले. तसेच यावेळी प्रियंका चौक येथे राजेंद्र शिरकुल यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब, आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमात भाजप आणि मनसे मधुन हनमंतु रूपनर, योगेश सोलापुरे, ईश्वर सरवदे, सूरज शिरकुल, मनोज पाटील, कविता वरगंटी, राजेश येले, श्रीनिवास कोटा यांनी आपल्या समर्थकांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांचे निवडीचे पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, वैदु, वंचित, भटक्या विमुक्त समाज गेल्या पस्तीस वर्षापासून माझ्या आणि काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा असून पूर्वी वैदु वस्ती हा भाग अतिशय मागासलेला होता. मूलभूत सोईसुविधा नव्हत्या. या भागाचा अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न प्रयत्न केला. या भागातील स्व. रामभाऊ शिरकुल यांनी आयुष्याच्या शेवटपर्यंत काँग्रेस पक्षाला साथ दिली. राजेंद्र शिरकुल ही त्यांच्याच पावलावर पाउल ठेवून आमच्यासोबत काम करत आहे त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहु. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर या गावकुसाबाहेर राहणाऱ्या, वैदु, वंचित, गारुड़ी, भटक्या विमुक्त जाती जमातीच्या उन्नतीसाठी चारशे कोटी आर्थिक तरतूद केली होती. गेली पस्तीस वर्षे या भागातील जनतेने मला प्रत्येक वेळी निवडणुकीत साथ दिली होती याचा आभार व्यक्त करतो. काम करण्याची भूमिका आणि सेवा करण्याची भूमिका घेऊन आम्ही पुढे जात आहोत. समाजातील गोरगरिब, वंचित व सामान्य नागरिकांसाठी काम केल्यावर जे समाधान मिळतं ते दुसऱ्या कशातच मिळत नाही. म्हणून मी सदैव अशा लोकांच्या न्याय-हक्कासाठी कटिबध्द राहून काम करत आहे. तसेच हा कार्यक्रम घेतल्याबद्दल राजेंद्र शिरकुल व विवेक कन्ना आणि उपस्तित सर्व नागरिक बंधु भगिनींचे आभार व्यक्त करतो.

या कार्यक्रमास प्रदेश चिटणीस किसन मेकाले गुरुजी, मा नगरसेवक विनोद भोसले, युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे, ब्लॉक अध्यक्ष देवाभाऊ गायकवाड़, अंबादास बाबा करगुळे, अँड अमित आलंगे, अँड केशव इंगळे, नागनाथ कदम, सिद्धाराम चाकोते, सुशील बंदपट्टे, चक्रपाणी गज्जम, हसीब नदाफ, दत्तू बंदपट्टे, तिरुपती परकीपंडला, दीनानाथ शेळके, श्रीकांत वाडेकर, नूर अहमद नालवार, प्रवीण जाधव, युवराज जाधव, वसिष्ठ सोनकांबले, किशोर सरवदे, महेश जोकारे, कुणाल गायकवाड, मल्लीनाथ सोलापुरे, शरद गुमटे, सुभाष वाघामारे, नागनाथ शावने, संजय गायकवाड, नागेश बोमड्याल, पशुपती माशाळ, शिवाजी सालुंखे, चंद्रकांत टिकके, शिवशंकर अंजनाळकर, विकास येळेगावकर, श्रीनिवास परकीपंडला, श्रीकांत दासरी, मनोहर चकोलेकर, सचिन शिंदे, खाज जतकार, गुरु वरगंटी, दुर्गादास शिरकुल, दुर्गी वरगंटी, तायप्पा शिवराल, यल्लाप्पा शिवराल, रफीक जतकार, पाटील शिवराल, यांच्यासह जवळपास एक हजार नागरिक बंधु भगिन उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्हनमोरे सर, प्रास्ताविक राजेंद्र शिरकुल, तर आभार विवेक कन्ना यांनी केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या