महाविकास आघाडीच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबीर
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त उपक्रम
B1न्यूज मराठी नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर : महाविकास आघाडीच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उदघाटन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्याहस्ते करण्यात आले.
संजयनगर, मुकुंदवाडी येथे आयोजित कार्यक्रमात उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब डांगे, शहरप्रमुख ज्ञानेश्वर डांगे, उपशहरप्रमुख सचिन वाघ, विजय साळवे, अशोक डोळस, मनोज गांगवे, मगरे अंकल, नाना जगताप, आर. बी.चव्हाण, विष्णू गुंठाळ, लक्ष्मण पिवळ,संजय मांमडकर, हनुमंत लोहार,भाऊसाहेब राते यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन सोनल पवार केले होते. यावेळी या शिबिरात मोठ्या संख्येने नागरीकांनी लाभ घेतला.