मुलाच्या लग्नाच्या आहेराची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत
B1न्यूज मराठी नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर : मुलाच्या लग्नामध्ये आहेर न स्विकारता पत्रिकेतच क्युआर कोड देऊन त्याद्वारे रोख स्वरुपात जमा झालेला ५५ हजार रुपयांचा आहेर आज एकबोटे कुटुंबियांनी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देणगी म्हणून जमा केला. डॉ. अभय व सौ. नंदा या एकबोटे दाम्पत्याने आज मदतीचा धनादेश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या कडे सुपूर्द केला.
अतिवृष्टीमुळे अरिष्ट्यात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाथी समाजातील सर्व घटक हे मुख्यमंत्री सहायता निधीत आपले योगदान देत आहेत. डॉ. अभय एकबोटे यांच्या मुलाचे डॉ. कौशिकचे लग्न डॉ. रेया यांच्याशी शुक्रवार दि.५ डिसेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे पार पडले. या लग्नाच्या पत्रिकेत विवाह प्रसंगी वधूवरांना देण्यात येणारा आहे न स्विकारण्याबाबत एकबोटे कुटुंबियांनी आपल्या आप्तेष्टांना कळविले होते. तसेच शेतकऱ्यांसाठी मदत देण्यासाठी पत्रिकेतच क्यु आर कोड प्रसिद्ध करण्यात आला. त्याप्रमाणे आप्तेष्टांनी आपली मदत दिली. ती तब्बल ५० हजार रुपये इतकी झाली. त्यात एकबोटे कुटुंबियांनी स्वतःचे ५ हजार रुपये असे ५५ हजार रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी स्वामी यांच्या सूपूर्द केला. निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते हे यावेळी उपस्थित होते.




