कर्मवीर सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांची जयंती साजरी
बार्शी : येथील कर्मवीर सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीने थोर समाजसुधारक,स्त्री शिक्षणाचे आद्य प्रवर्तक,बहुजनांचे उध्दारक, सत्यशोधक समाजाचे संस्थापक क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांची १९६ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्षपदी ग्रंथालयाचे उपाध्यक्ष धैर्यशिल देशमुख हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत वडेकर, सुहास सुतार, सतीश पाचकुडवे आदी उपस्थित होते.
प्रथमतः प्रमुख मान्यवरांचे हस्ते क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी म.फुले यांच्या जीवनचरित्राची व उत्तुंग कार्याची माहिती व्हावी या अनुषंगाने प्रतिमेसमोर ग्रंथालयातील उपलब्ध साहित्याची मांडणी करण्यात आली होती, यावेळी सभासद व वाचक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हनुमंत तुपे,वैभव जगताप यांनी परिश्रम घेतले तर सुत्रसंचालन व आभार ग्रंथपाल विनोद गायकवाड यांनी व्यक्त केले.