मॅरेथॉन स्पर्धेत ओंकार पाटील विजेता , बार्शीत रिपाइं (आ) युवक आघाडीचे आयोजन
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त रिपाइं युवक आघाडी आठवले गटाच्या वतीने आयोजित केलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत पाथरी (ता. बार्शी) चा ओंकार पाटील याने प्रथम क्रमांक पटकावला. बार्शी ते बळेवाडी अशी सहा किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धा मंगळवारी उत्साहात पार पडली.
मातोश्री रमाई चौक, बाळेश्वर नाका येथून सुरू झालेल्या या मॅरेथॉनमध्ये मोठ्या संख्येने युवकांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ वकील ॲड. संजय जाधव व ज्येष्ठ नेते विरेंद्र कांबळे यांनी झेंडा दाखवून केले. मॅरेथॉनचे आयोजन रिपाई युवक आघाडीचे शहर अध्यक्ष ॲड. धीरज कांबळे यांच्यासह कुणाल चव्हाण, रोहित कांबळे , प्रशांत शिंदे दिनेश शिंदे, सिध्दार्थ कांबळे आकाश खुने यांनी केले.
यावेळी रिपाई आठवले गटाचे चंद्रकांत बोकेफोडे, वीरेंद्र कांबळे, ॲड अविनाश गायकवाड, नगरसेवक ॲड महेश जगताप, नगरसेवक अण्णा लोंढे, प्रद्यापक अशोक सावळे,ॲड किशोर करडे, कामगार नेते अजित कांबळे, मक्रोज बोकेफोडे , ॲड. योगेश सावळे, उमेश पवार, धीरज भोसले आदी उपस्थित होते. स्पर्धेतील विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रथम क्रमांक ओंकार पाटील (पाथरी), व्दितीय क्रमांक ओंकार शिंगणे (पुणे), तृतीय आनंद सातपुते (परंडा).