शेतकऱ्यांचे पैसे बुडवून मातीत तोंड घालून बसाल तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही!…शंकर गायकवाड

0

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना आंदोलनाचे निवेदन देताना शेतकरी संघटनेचे राज्याध्यक्ष शंकर गायकवाड व इतर शेतकरी

बार्शी : मागील अनेक वर्षातील पीक विम्याचे पैसे अद्यापही सर्व पिक विमा कंपन्यांनी राज्यभरातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा न केल्यामुळे शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड यांचे नेतृत्वाखाली मुंबई, पुणे येथील शासकीय व पिकविमा कंपनीच्या कार्यालयावरती अनेक आंदोलने करण्यात आली. त्या आंदोलनानंतर दरवेळी कंपन्यांनी हजारो कोटी राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले असले तरीही सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अजूनही मागील तीन वर्षाची पिक विमा कंपन्यांकडून येणे बाकी असल्यामुळे गायकवाड यांनी केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 3 एप्रिल रोजी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हास्तरीय संयुक्त समिती व जिल्हास्तरीय तक्रार निवारण समिती सोबत घेण्यात आलेल्या आढावा बैठकीमध्ये संबंधित पिक विमा कंपन्यांचे राज्य व्यवस्थापक यांना मागील सर्व प्रलंबित पिक विमा देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी दिलेल्या असल्या तरी ठरल्याप्रमाणे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर रकमा जमा न झाल्यास पुन्हा संबंधित राज्यस्तरीय शासकीय व विमा कंपनीच्या कार्यालयावरती १९ एप्रिल पासून आंदोलने सुरू करणार असल्याचे सांगून, तीन-तीन वर्ष कंपन्यांना शेतकऱ्यांचे पैसे देणे जमत नसेल तर त्यांनी आपला गाशा गुंडाळून कंपन्या बंद करून टाकाव्यात! परंतु शेतकऱ्यांचे पैसे बुडवून मातीत तोंड घालून बसाल तर आम्ही आता सोडणार नाही! असा खणखणीत इशाराही यावेळी बोलताना गायकवाड यांनी दिला. त्यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे सचिन आगलावे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शरद भालेकर, दयानंद चौधरी, आनंद नरवडे, अरुण नलवडे, शशिकांत गोरे, चंद्रकांत जाधव, आकाश काटकर, राजाभाऊ लाडेकर, गोटू पाटील, राजेंद्र फरताडे, बाळासाहेब भायगुडे आदींसह बहुसंख्य शेतकरी यावेळी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या