अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस जागा भरती प्रक्रियेला सुरुवात
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प बार्शी ता. बार्शी अंतर्गत अंगणवाडी सेविका, मदतनीस, व मिनी सेविका पदाकरिता 2022 महाराष्ट्र शासन महिला व बालकल्याण विभागाकडील शासन निर्णय क्रमांक एबावि – 2022 प्र.क्र.94/का. 6 दिनांक 02 फेब्रुवारी 2023 नुसार व मा. जिल्हा कार्यक्रम अधिकारी (मवबावि ) जिल्हा परिषद, सोलापूर यांचे कडील पत्र क्रं एबाविसेयो /मबावि / आस्था – 2 /64/2023, दिनांक 16/02/2023 नुसार एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प बार्शी, ता. बार्शी, जिल्हा परिषद, सोलापुर अंतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या रिक्त पदावर नियुक्ती करावयाच्या आहेत. खालिलप्रमाणे दिलेल्या अटी व शर्तीनुसार ज्या गावातील पद रिक्त आहे, त्याच गावातील पात्र महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 05 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी 6:15 वाजेपर्यत, बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, बार्शी तालुका पंचायत समिती, आवार बार्शी येथे सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत अर्ज स्विकारण्यात येतील.




