व्यवसायाभिमुख शिक्षणाला प्राधान्य देणं आज काळाची गरज, आजच्या बजेटमध्येही त्या दिशेने महत्वाचे पाऊल – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील 

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

नवी दिल्ली, ०१ फेब्रुवारी : आज अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी बजेट सादर करण्यास सुरुवात केली आहे. या बजेटमधुन अनेक दिलासादायक गोष्टी मांडण्यात आल्या आहेत. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सीतारमन यांचे या बजेट साठी आभार मानले आहेत. व्यवसायाभिमुख शिक्षणाला प्राधान्य देणं आज काळाची गरज आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातही यावर भर देण्यात आला आहे. बजेट सेशन २०२३ मध्येही त्या दिशेनं महत्त्वाचं पाऊल टाकण्यात आलं आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

चंद्रकांत पाटील यांनी बजेटमधील काही महत्वाचे मुद्दे मांडले आहेत ते म्हणजे प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना ४. ० लवकरच येणार, यासोबतच नोकरीस उपयुक्त प्रशिक्षण तसेच व्यावसायिक भागीदारी सोबत नव्या व्यावसायिक गरजेनुसार तरुणांच्या कौशल्य विकासावर भर देण्यात येणार आहे. कौशल्य विकासासाठी देशभरात ३३ स्किल डेव्हल्पमेंन्ट सेंटर्स होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.चंद्रकांत पाटील यांनी पुढे आणखी एका मुद्दयावर लक्ष केंद्रित केले आहे , ते म्हणजे  वाचनाचं महत्त्व लक्षात घेऊन त्याला तंत्रज्ञानाची जोड देऊन केंद्रीय अर्थमंत्री सीतारमन आजच्या बजेटमध्ये डिजिटल पुस्तकालयाची स्थापना करण्याचा मुद्दा मांडला आहे. यासाठी चंद्रकांत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. ३ वर्षात केंद्र सरकार करणार एकलव्य मॉडेल निवासी शाळा साठी ३८८०० शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती. या शाळांतील ३ लाख ५० हजार विद्यार्थ्यांचा फायदा होणार आहे. विद्यार्थ्यांच्या फायद्यासाठी राष्ट्रीय डिजिटल पुस्तकालयाची स्थापना होणार आहे. विद्यार्थीच नव्हे तर शिक्षकांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या प्रशिक्षणासाठी उत्तम संस्था उभारणार असल्याचे या अर्थसंकल्पात नमूद करण्यात आल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. चंद्रकांत पाटील यांनी मोदी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या