“येत्या काळात डिजिटल मीडिया पत्रकारांची महत्त्वपूर्ण भूमिका असणार…!” – अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर : काळ बदलत आहे त्यामुळे त्याप्रमाणे पत्रकारितेचे स्वरूपही बदलले आहे, डिजिटल मीडियाच्या पत्रकारांनी आपली जबाबदारी ओळखून बातमी मागील वेगळेपणा देण्याचा प्रयत्न करावा. डिजिटल मीडिया ज्ञान, माहिती व मनोरंजन क्षेत्रात क्रांती झाली आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांनी आपल्या जबाबदारीचे भान ठेवून काम करावे, येत्या काळामध्ये डिजिटल मीडिया पत्रकारांची महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे असे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी केले.

यावेळी बोलताना राजा माने म्हणाले की, गेल्या दोन वर्षांपूर्वी डिजिटल मीडियाच्या पत्रकारांना एकत्र आणण्यासाठी या संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. पत्रकारांचे हक्क, कर्तव्य, जबाबदाऱ्या याशिवाय डिजिटल मीडियामध्ये काम करणाऱ्या पत्रकारांना एकसंघ बांधण्याचे काम हे संघटना करते. डिजिटल मीडियाचा कायदा करण्यासाठी देशभरात आपली संघटना रोल मॉडेल ठरेल. डिजिटल मीडियाच्या पहिल्या अधिवेशनासाठी महाराष्ट्रातील तब्बल दीड हजार पेक्षा जास्त पत्रकारांनी हजेरी लावली होती. डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्मची नोंदणी, ओळखपत्र यासाठी शासनाकडे ठोस पाठपुरावा चालू असल्याचे प्रतिपादनही त्यांनी केले.पोलीस उपायुक्त विजय कबाडे बोलताना म्हणाली की, डिजिटल मीडियाच्या उत्क्रांतीमुळे सहजासहजी माहिती चे स्रोत उपलब्ध झाले आहेत. पत्रकार व पोलीस प्रशासन यांच्यातही चांगली मैत्री होऊ शकते, याच माध्यमातून बीडमध्ये अधिकारी म्हणून काम करत असताना कोरोना काळात वेगवेगळे उपक्रम राबवल्याची माहिती दिली. वित्त व लेखा अधिकारी अजयसिंह पवार म्हणाले ऑनलाईनच्या काळात सोशल मीडियामुळे प्रत्येक जण पत्रकार बनला आहे. खरे-खोटे ठरवायला जनतेकडे वेळ नाही. त्यामुळे पत्रकारांची सर्वाधिक गरज येणार्‍या काळात वाढत जाणार आहे. येणार्‍या काळात माध्यमे बदलत राहतील, मात्र बातमी सांगणारा कायम राहणार असून ते काम पत्रकारांनी प्रामाणिकपणे करावे, असे आवाहन त्यांनी केले.

मानवता संयुक्त संघाचे संघटनमंत्री डॉ. विजयकुमार केसकर म्हणाले मानवता संयुक्त संघाच्या माध्यमातून समाजामध्ये विविध क्षेत्रात काम करणाऱ्या हि संघटना काम करते. डिजिटल मीडिया पत्रकारांसाठी राजा माने यांनी जी चळवळ सुरू केली आहे ती निश्चितच कौतुकास्पद आहे असेही ते म्हणाले. डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना व मानवता संयुक्त संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहामध्ये पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. मानवता संयुक्त संघाचे जिल्हाध्यक्ष तथा डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघाचे उपाध्यक्ष विजय कोरे, डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, शहराध्यक्ष प्रशांत कटारे, मानवता सहित संघाचे उपाध्यक्ष विश्वजीत देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये पत्रकारांचा सन्मान सोहळा संपन्न झाला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या