सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांना गती देण्यात यावी – पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

0

B1न्यूज मराठी नेटवर्क500

कोल्हापूर : या जिल्ह्यातील पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी नदी परिसरात असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्या ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या सामूहिक औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया (सीईटीपी) प्रकल्पांच्या कामांना गती द्यावी तसेच या अनुषंगाने राज्यातील सर्वच महानगरपालिकेच्या कामकाजाचा आढावा मुंबई येथे आपण लवकरच घेणार असल्याचे प्रतिपादन पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. कोल्हापूर , इचलकरंजी येथील प्रदुषित क्षेत्रातील सर्व सामूहिक औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची क्षमता, प्रत्यक्ष वापर, तसेच या प्रकल्पांचा वापर करून योग्य अशा पाण्याचा पूर्ववापर करण्याच्या अनुषंगाने त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आढावा बैठक घेतली.

यावेळी आमदार सर्वश्री चंद्रदीप नरके, अमल महाडिक ,राहुल आवाडे, अशोक माने , महापौर रूपाराणी निकम इचलकरंजी महापौर उदय धातुंडे, माजी खासदार राजू शेट्टी, जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड ,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ जॅसमिन, मनपा आयुक्त डॉ राजेंद्र भारूड, इचलकरंजी मनपा आयुक्त पल्लवी पाटील,अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्रीमती मुंडे म्हणाल्या,मंजूर सामूहिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची आणि यांत्रिकीकरणाची कामे तसेच त्यांना जोडणाऱ्या पाइपलाइनची कामे एकाच वेळी सुरू ठेवावीत . पर्यावरण रक्षणाची जबाबदारी केवळ पर्यावरण विभागाची नाही तर ती सामूहिक जबाबदारी असून भविष्यातील धोके नागरिकांनी ओळखून आत्तापासूनच जागृत व्हावे. कोल्हापूरसह इचलकरंजी येथील सर्वच सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांच्या क्षमतेची पाहणी करून तेथील अहवाल सादर करवा असे निर्देश दिले तसेच छोट्या गावांनी पर्यावरण पूरक प्लॅन तयार करावेत अशी अपेक्षाही त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली.500लोकसंख्येच्या निकषावर त्या त्या गावात घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाचा बाबतीतील प्लॅन तयार करावेत अशी सूचना आ.चंद्रदीप नरके तर पंचगंगा नदीतील जलपर्णी काढण्यासाठी निधीची तरतूद व्हावी त्याचबरोबर इचलकरंजी मनपाला जी एस टीमधील फरक मिळावा अशी अपेक्षा आ. राहुल आवाडे यांनी व्यक्त केली.सध्या जिल्हा परिषदेकडून 41 कोटीची कामे सुरू असून सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनासाठी जिल्हा परिषदेला अतिरिक्त निधी मिळावा अशी मागणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन यांनी केली. यावेळी आयुक्त डॉ भारुड व श्रीमती पाटील यांनी अनुक्रमे कोल्हापूर व इचलकरंजी येथील पंचगंगा नदीचे प्रदूषण तसेच सांडपाण्याच्या अनुषंगाने सुरू असलेल्या प्रकल्पांबाबतची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.

यावेळी श्रीमती मुंडे यांनी कोल्हापूर , इचलकरंजी शहर ,नदी परिसरातील ग्रामपंचायत तसेच औद्योगिक क्षेत्रातून पंचगंगा नदीमध्ये जाणाऱ्या सांडपाण्यामुळे होणाऱ्या प्रदुषणाचा दीर्घ आढावा घेतला. याप्रसंगी जल अभियंता हर्षदीप घाडगे , मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार ,पर्यावरण अधिकारी समीर वाघ्रांबरे , यांच्यासह प्रदूषण ,एमआयडीसी तसेच पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी – पदाधिकारी मोठ्या संखेने उपस्थित होते.500

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या