रेशन तांदळाच्या काळाबाजार प्रकरणातील दोन महिन्यांपासून फरार आरोपी जेरबंद; API अक्षय सोनवणे यांच्या पथकाची शिताफीची कारवाई

0

B1 न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : गोरगरिबांच्या हक्काच्या रेशन तांदळाचा काळाबाजार करणाऱ्या आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल दोन महिन्यांपासून फरार असलेल्या दोन आरोपींना बार्शी तालुका पोलिसांनी शिताफीने अटक केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सापळा रचून ही कारवाई केली.

बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 232/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम 316(2), 316(5) तसेच अत्यावश्यक वस्तू अधिनियम 3 व 7 अन्वये तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील दिगंबर उर्फ आप्पा संभाजी सुरवसे आणि विवेक उर्फ भगवान संभाजी सुरवसे (रा. बुरुड गल्ली, बार्शी) हे दोघे गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होते.

दरम्यान, दोन्ही आरोपींचा अटकपूर्व जामीन माननीय न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांचा शोध घेण्यासाठी API अक्षय सोनवणे यांनी विशेष मोहीम सुरू केली. आरोपींनी पोलिसांना चकवा देण्यासाठी जवळपास सात मोबाईल क्रमांक बदलले, वेशभूषा बदलली आणि विविध जिल्ह्यांत लपून राहत होते.500मात्र तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपी बार्शी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत लपून बसल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला. आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असतानाच त्यांना पकडून अटक करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना आज माननीय न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. या काळात रेशन तांदळाच्या काळाबाजाराशी संबंधित अधिक तपास केला जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी

ही कारवाई सोलापूर ग्रामीण पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, बाबासाहेब हांडे, प्रदीप जगताप, सिद्धेश्वर लोंढे, गोविंद बचुटे, आकाश कांबळे तसेच सोलापूर ग्रामीण सायबर विभागातील राहुल सोनकर आणि विश्वनाथ वस्त्रद यांनी संयुक्तपणे केली.500

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या