आरोग्यउद्घाटनकोल्हापूरमहाराष्ट्र

जिल्ह्यात राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिमेचा शुभारंभ; १ ते १९ वर्षे वयोगटातील एकूण ७ लाख ७७ हजार ६०० लाभार्थ्यांना जंतनाशक गोळी देण्याचे नियोजन

उचगाव येथे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जास्मिन यांच्या हस्ते जिल्हास्तरीय उद्घाटन

B1न्यूज मराठी नेटवर्क500

कोल्हापूर दि २७ : जिल्ह्यातील बालकांचे आरोग्य सुदृढ राखण्यासाठी आणि त्यांना जंत संसर्गापासून मुक्त करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ करवीर तालुक्यातील उचगाव येथील कुमार व कन्या विद्यामंदिर येथे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.जॅसमीन यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांना अल्बेंडाझोल जंतनाशक गोळ्या देऊन मोहिमेची सुरुवात करण्यात आली.

यावेळी मुख्य कार्य.अधिकारी डॉ. जॅसमीन यांनी राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिमेचे महत्त्व विशद केले. बालकांच्या आरोग्याचे संरक्षण, शारीरिक वाढ आणि सर्वांगीण विकासासाठी जंतनाशक उपचार महत्त्वाचे असल्याचे सांगून जिल्ह्यातील एकही पात्र लाभार्थी या मोहिमेपासून वंचित राहणार नाही, याची सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दक्षता घ्यावी,अशी सूचनाही केली.

जिल्ह्यात या मोहिमेसाठी ७ लाख ७७ हजार ६०० लाभार्थ्यांची नोंद करण्यात आली होती.२७ ऑक्टोबर रोजी ज्या पात्र लाभार्थ्यांना काही कारणास्तव जंतनाशक गोळीचा डोस मिळू शकला नाही, अशा लाभार्थ्यांना येत्या ३ नोव्हेंबर रोजी मॉप-अप दिनानिमित्त अल्बेंडाझोल गोळी देण्यात येणार आहेत.त्यामुळे कोणताही पात्र लाभार्थी जंतनाशक उपचारापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता आरोग्य विभागामार्फत घेण्यात येत आहे.500बालकांमधील जंतसंसर्गामुळे होणारा रक्तक्षय, कुपोषण तसेच शारीरिक व बौद्धिक विकासातील अडथळे कमी करण्यासाठी जंतनाशक उपचार उपयुक्त ठरतात. त्यामुळे पालकांनी, शिक्षकांनी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी मोहिमेत सक्रिय सहभाग घेऊन सर्व पात्र बालकांना जंतनाशक उपचार मिळतील याची खात्री करावी, असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

यावेळी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एम.बी देशमुख, जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. दीपक मेंढेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उत्तम मदने,वैद्यकीय अधिकारी डॉ.पोळ,आयसीडीएस अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र उचगाव येथील सर्व कर्मचारी तसेच कुमार व कन्या विद्यामंदिर मुख्याध्यापकांसह सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button