महाराष्ट्रवाशिम

अवैध गर्भलिंग निदानाची माहिती ‘१०४’वर द्या; माहितीगारास १ लाखांचे बक्षीस – जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल कावरखे

B1न्यूज मराठी नेटवर्क500

वाशिम, दि. २६ ऑक्टोबर : जिल्ह्यात गर्भलिंग निदान व कन्या भ्रूणहत्येसारख्या बेकायदेशीर प्रकारांना प्रतिबंध घालण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. अशा प्रकारांची विश्वसनीय माहिती देणाऱ्या पात्र माहितीगारास शासनाच्या नियमानुसार १ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल कावरखे यांनी केले.

पीसीपीएनडीटी सल्लागार समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अविनाश पुरी, डॉ. अल्का मकासरे, डॉ. जयकिशन बाहेती,डॉ.जया बिबेकर,डॉ.उज्ज्वला गिऱ्हे,डॉ.गोपाल हेंबाडे आणि विधी सल्लागार अॅड. राधा नरवलिया उपस्थित होते.500पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत गर्भलिंग निदान हा गंभीर व दंडनीय गुन्हा आहे. अशा प्रकारांची माहिती देणाऱ्या व्यक्तीची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल. संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल होऊन कायदेशीर कारवाई झाल्यानंतर पात्र माहितीदारास बक्षीस देण्यात येईल, असे डॉ. कावरखे यांनी सांगितले.

गर्भलिंग निदान, कन्या भ्रूणहत्या किंवा पीसीपीएनडीटी कायद्याच्या उल्लंघनाची माहिती असल्यास नागरिकांनी १०४ या राज्यस्तरीय आरोग्य सहाय्य क्रमांकावर किंवा १८०० २३३ ४४७५ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. मुलींच्या जन्माचे संरक्षण आणि स्त्री-पुरुष लिंग गुणोत्तर संतुलित राखण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button