क्रीडा विषयकमहाराष्ट्रमुंबई

अवघ्या 38 चेंडूंत 113 धावा! अभिषेक शर्माच्या वादळी खेळीने भारताला मिळवून दिला विजय

B1न्यूज मराठी नेटवर्क500

मुंबई : Abhishek Sharma IND vs NZ 3rd T20 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात अभिषेक शर्माने दमदार फलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिला. त्याने अवघ्या 38 चेंडूंत 113 धावा केल्या. या खेळीत त्याने 9 चौकार आणि 11 षटकार मारले. अभिषेकने केवळ 15 चेंडूंत अर्धशतक पूर्ण करत आक्रमक फलंदाजीचे प्रदर्शन केले. त्यांचा या दमदार खेळीने चाहते फिदा झाले आहे. सर्वत्र अभिषेक शर्माचे चर्चा होत आहे.

प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 20 षटकांत 3 गडी गमावून 198 धावा केल्या. डॅरिल मिचेलने नाबाद 89 धावांची खेळी केली. त्याने 52 चेंडूंत 5 चौकार आणि 5 षटकार मारले. फिन ॲलनने 40, तर बेव्हन जेकब्सने नाबाद 39 धावा केल्या. भारताकडून अर्शदीप सिंग, अक्षर पटेल आणि नितीश रेड्डी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.500199 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने आक्रमक सुरुवात केली. अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशी यांनी पहिल्या विकेटसाठी 43 चेंडूंत 133 धावांची भागीदारी केली. अभिषेकच्या शतकामुळे भारताचा विजयाचा मार्ग सोपा झाला. भारताने अवघ्या 13.2 षटकांत 4 गडी गमावून 199 धावा केल्या आणि सामना जिंकला. न्यूझीलंडकडून काईल जेमिसनने दोन विकेट घेतल्या.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button