वंचित बहुजन आघाडीच्या बार्शी शहराध्यक्षपदी धनंजय जगदाळे यांची निवड
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : वंचित बहुजन आघाडीची बार्शी शहर कार्यकारिणी जाहीर झाली असून शहराध्यक्षपदी धनंजय जगदाळे यांचीच फेरनिवड करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी नुकतीच शहर कार्यकारिणीची निवड जाहीर केली. निवडण्यात आलेले इतर पदाधिकारी असे शहराध्यक्ष धनंजय जगदाळे, महासचिव किशोर ढोले, सचिव प्रमोद गायकवाड, उपाध्यक्ष आनंद चव्हाण, प्रमोद ननवरे, सुरेश चकोर, कोषाध्यक्ष रोहित बोकेफोडे, स्वप्निल लंकेश्वर, संघटक सिद्धार्थ कसबे, अमीर पठाण, शाहरुख सय्यद, आकाश चाबुकस्वार, किरण भालशंकर यांची निवड झाली. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन होत आहे. निवडीनंतर धनंजय जगदाळे म्हणाले, यापुढे पक्षवाढीसाठी तसेच सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी काम करणार असल्याचे त्यांनी
यावेळी सांगितले.