बार्शीसामाजिक

मालवंडी बाजारातील मुख्य रस्त्याची दुरवस्था

B1न्यूज मराठी नेटवर्क

मालवंडी : बाजारपेठेतून ग्रामपंचायतकडे जाणऱ्या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल झाला आहे.

मालवंडी : बार्शी तालुक्यातील मालवंडी येथील एसटी स्टँड ते ग्रामपंचायत या मुख्य रस्त्याची दुरवस्था झाली असून चिखल आणि कचऱ्याने रस्ता व्यापला आहे. प्रत्येक सोमवारी मालवंडीत आठवडी बाजार भरतो, आसपासच्या ‌खेड्यातून व्यापारी विक्रिसाठी मालवंडीत येतात. व्यापाऱ्यांकडून ग्रामपंचायत प्रत्येकी दहा रुपये ‘बाजार कर’ वसूल केला जातो.मात्र व्यापाऱ्यांना चिखलात बसून विक्री करावी लागते.विक्रीसाठी अनलेला भाजीपाला चिखलात ठेवावा लागत असल्याने यातून मालवंडीतील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहिला आहे. वर्षेनुवर्ष मालवंडीत आठवडी बाजार चालतो, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून व्यापाऱ्यांकडून कर देखील वसूल केला जातो मात्र व्यापाऱ्यांना सुविधा दिल्या जात नाहीत. पिण्यासाठी स्वच्छ पाण्याची सुविधा नाही, शौचालय नाहीत, ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण व्हावे याकरिता छत नाही.या असुविधेबद्दल अनेक व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.
बाजार कट्ट्यावर अनेक ठिकाणी कचरऱ्याचे ढीग साचले असून त्यामधून दुर्गंधी पसरली आहे.एसटी स्टँड ते ग्रामपंचायत हा बाजारातून जाणारा मुख्य रस्ता असल्याने या रस्त्यावर व्यापारी बसल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button