जॉन डीअर च्या नवीन 3036EN ट्रॅक्टर व MAT अवजाराचे मधुबन ट्रॅक्टर्स, बार्शी येथे अनावरण

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : मधुबन ट्रॅक्टर्स बार्शी येथे जॉन डियर 3036 EN या नवीन ट्रॅक्टर चे व ‘ मॅट ‘ या अवजाराचे अनावरण जॉन डीअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड च्या मान्यवर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी मधुबन उद्योग समूहाचे चेअरमन प्रविण कसपटे, कंपनीचे मार्केटिंग मॅनेजर संजय सिंग, पार्ट मॅनेजर राहुल गोराणे, असिस्टंट एरिया मॅनेजर कैलास तासकर, रोटरी क्लब बार्शी चे अध्यक्ष ॲड. विक्रम सावळे, प्रगतशील शेतकरी माऊली पाटील बार्शी, विलास पाटील बार्शी, श्रीराम तमाचे भूम, वसंत कुटे भूम, नरेश दीक्षित परंडा, गणेश माने, परंडा इ. उपस्थित होते.
यावेळी प्रवीण कसपटे यांनी मधुबन उद्योग समूह हा तेरा वर्षापासून निरंतर ग्राहकांना ट्रॅक्टर संबंधी चांगली सेवा देत असल्याचे सांगितले. कैलास तासकर व राहुल गोराणे यांनी जॉन डीअर च्या नवीन ट्रॅक्टर व मॅट या अवजाराची सखोल माहिती सर्व उपस्थित ग्राहकांना दिली. संजय सिंग यांनी जॉन डीअर च्या नवीन पेरणी यंत्राचे महत्त्व शेतकऱ्यांना पटवून सांगितले व अधिक शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. ॲड. विक्रम सावळे यांनी शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अशा जॉन डीअर ट्रॅक्टर ची निवड केल्याबद्दल ग्राहकांचे अभिनंदन केले. जॉन डियर ट्रॅक्टर चे ग्राहक लक्ष्मण सातपुते यांनी जॉन डियर ट्रॅक्टर सर्वोत्तम असल्याचे मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने नवीन ११ ग्राहकांना जॉन डीअर ट्रॅक्टर मान्यवरांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेश ठाकूर यांनी केले तर आभार मधुबन ट्रॅक्टर टीम चे मार्गदर्शक माणिक हजारे यांनी मानले.