छत्रपती संभाजीराजे कार्य गौरव पुरस्काराने आतिश गायकवाड सन्मानित

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : पाथरी ता. बार्शी येथील सुपुत्र राष्ट्रवादी पदवीधर काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष व ग्राहक संरक्षण समिती सोलापूर जिल्हा सरचिटणीस श्री आतिश गायकवाड यांना “राज्यस्तरीय छत्रपती शंभूराजे कार्य गौरव पुरस्कार २०२२ ने सन्मानित करण्यात आले. शंभू सेनेच्या वतीने आतिश गायकवाड यांना हा मानाचा राज्यस्तरीय पुरस्कार माढा येथे झालेल्या कार्यक्रमात प्राचार्य डॉ सुरेश ढेरे व शंभू सेनेचे संस्थापक अध्यक्ष अतुल नाना माने पाटिल यांच्या हस्ते सन्मानचिन्ह ,सन्मानपत्र, मानाचा फेटा, शाल श्रीफळ देऊन प्रदान करण्यात आला. आतिश गायकवाड यांनी अनेक संकटे,आव्हाने आणि प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे. निराधार गरजू लोकांना कपडे व अन्नदान करणे , बार्शी येथे रक्तदान शिबिर आयोजित करणे ,कोरोनाच्या काळात कोरोना मदत कक्षाच्या मध्यामातुन रुग्णांना बेड उपलब्ध करून देणे, प्लाजमा उपलब्ध करून देणे, ग्राहक संरक्षण समितीच्या माध्यमातून गोर गरिबांच्या अडचणी दूर करणे , शासकीय सेवाच्या बाबतीत लोकजागृती करणे, सामान्य लोकांना पंचायत समिती जिल्हा परिषद येथे कामाच्या बाबतीत येणाऱ्या अडचणी दूर करण्यास मदत करणे, गावपातळीवर देखील केंद्र सरकार संचलित एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन अंतर्गत सचिव म्हणून उत्कृष्ठ काम केले आहे.
तसेच सुशिक्षित युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे, आदी समाज उपयोगी कामे त्यांनी केली आहेत..राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी देखील त्यांचे कौतुक केले आहे.