सलग नवव्या वर्षी युगदर्शक आयकॉन पुरस्काराचे आयोजन

B1न्यूज मराठी नेट
पानीपतकार विश्वास पाटील यांच्या उपस्थितीत २८ मे रोजी बार्शीत रंगणार सोहळा
बार्शी -सालाबाद प्रमाणे सलग नवव्या वर्षात पदार्पण करणारा युगदर्शक आयकॉन पुरस्कार सोहळा २०२२ यावर्षी २८ मे २०२२ वार शनिवार रोजी बार्शी येथे यशवंतराव चव्हाण सभागृह या ठिकाणी आयोजित केला असून यंदा या पुरस्कार सोहळ्यासाठी साहित्यीक, लेखक, दिग्दर्शक, इतिहास संशोधक पानिपतकार विश्वास पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करण्यासाठी येत असून प्रमुख उपस्थिती म्हणून सावता परिषद संस्थापक अध्यक्ष कल्याण (काका) आखाडे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री दिलीपरावजी सोपल हे असणार आहेत. तरी या कार्यक्रमास बार्शी व पंचक्रोशीतील नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन युगदर्शक प्रतिष्ठाणचे विश्वस्त नितिन भोसले यांनी केले आहे.दैदिप्यमान, रंजक, वैचारिक उंचीचा होणारा युगदर्शक आयकॉन पुरस्कार सोहळ्याच्या व्यासपिठावर यावर्षी प्रमुख उपस्थिती म्हणून उस्मानाबाद निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, बार्शी पोलिस निरीक्षक रामदास शेळके, माजी नगराध्यक्ष असिफभाई तांबोळी, शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, उद्योजक सुनिल भराडिया, युगदर्शक प्रतिष्ठाणचे मार्गदर्शक संतोष सुर्यवंशी, माधवबागचे डॉ. पवन कोळी, कॉटन किंग बार्शीचे अशोक जाधवर व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
पुरस्काराचे हे सलग नववे वर्ष असून यंदा विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या दहा गुणीजनांचा आयकॉन पुरस्काराने गौरव होणार असून त्यात महाराष्ट्र आयकॉन विश्वास पाटील, राज्यस्तरीय महसूल आयकॉन परंडा तहसिलदार रेणूकादास देवणीकर, राज्यस्तरीय पोलीस आयकॉन शिवाजी जायपत्रे, राज्यस्तरीय सरपंच आयकॉन वाळूजचे सरपंच डॉ. प्रियंका खरात, राज्यस्तरीय महिला आयकॉन उमा मुंबरे तर बार्शी आयकॉन श्रृंखले मध्ये युवा आयकॉन कृष्णराज बारबोले, शिक्षण व प्रशासन आयकॉन अनिल बनसोडे, सामाजिक आयकॉन वृक्ष संवर्धन समिती, वैद्यकीय आयकॉन डॉ. शितल बोपलकर, कला आयकॉन सुनिल यादव, श्रमिक आयकॉन अजित कांबळे यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
अशी माहिती युगदर्शक प्रतिष्ठाणच्या वतीने पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली. यावेळी सुधिर खाडे, दिनेश नाळे, सचिन गायकवाड, उदय पोतदार, गुरु साखरे, शितल नाळे, किरण भिसे, गणेश शिंदे, बापूसाहेब मोरे, यशवंत माने, माऊली नाळे, महेंद्र पाटील, विशाल भोसले, श्रीकृष्ण उपळकर, मिथुन भोसले, विशाल नवले, नितीन जाधवर, नरेश ठाकूर, शिवराज भोसले, रविराज भोसले आदी उपस्थित होते.