लाईटच्या डीपीवरून महावितरणच्या विरोधात तीव्र आंदोलनचा वंचितचे नेते विवेक गजशिव यांचा इशारा

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : येथील भीमनगर शेजारील सिद्धार्थ नगर येथे लाईटच्या डी.पी मुळे नविन उभारलेल्या समाज मंदिरास अडथळा निर्माण होत आहे.त्यामुळे तो डी.पी.दुसरीकडे स्थलांतरित करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडी या पक्षाचे नेते विवेक गजशिव यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता सुरेश कुराडे यांना अर्जाद्वारे केली होती.
परंतू भीमनगर व सिद्धार्थ नगर येथील नागरिकांच्या लोकभावनेकडे कार्यकारी अभियंता कुराडे यांनी दुर्लक्ष केल्याने आम्हाला आंदोलनाचे पाऊल उचलावे लागत असून दि.23 मे रोजी बार्शी तहसील कार्यालय येथे समाज बांधवांना घेऊन उपोषण करणार असल्याचे सांगितले. यावेळी गजशिव यांनी भीमनगर,सिद्धार्थ नगर सोबत शहरी व ग्रामीण भागातील घरांवरून लाईटच्या तारा गेल्या असल्यास प्लास्टिक पाईप टाकण्याची मागणी केली.तसेच रोडच्या मध्ये येणारे लाईटचे पोल काढण्याची मागणीही करण्यात आली.
मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलानास सामोरे जाण्याची तयारी महावितरण कार्यालयाने ठेवावी असा इशाराही यावेळी गजशिव यांनी दिला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या