आजपासून मालवंडीच्या शेखागौरी यात्रेस प्रारंभ

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बार्शी तालुक्यातील मालवंडी गावाचे ग्रामदैवत ‘श्री शेखागौरी’ यात्रेचा प्रारंभ सोमवार (ता: १६ ) मे पासून होत आहे.
सोमवारी रात्री दहा वाजता संदल व ताफे जंगी मुकाबला, आकरा वाजता धुमाकूळ म्युझिकल नाईट कार्यक्रम व शोभेचे दारुकाम. मंगळवारी रात्री सात वाजता पारंपरिक सोंगाचा कार्यक्रम, आठ वाजता शोभेच्या दारूकामचा तसेच विविध बॅन्डचा जंगी मुकाबला, आठ वाजता ऑर्केस्ट्रा धमाका व छाया वीरकर लोकनाट्य तमाशा असणार आहे.
यात्रेची सांगता बुधवारी होणार असून या दिवशी सकाळी दहा वाजता कलगीतुरा, लोकगीते व धनगर ओव्यांचा कार्यक्रम, दुपारी दोन वाजता जंगी कुस्त्यांचा फड, रात्री नऊ वाजता रघुवीर खेडकर सह शांताबाई सातारकर यांचा कार्यक्रम व लोकनाट्य तमाशा मंडळ नारायणगावकर अशा सांस्कृतिक कार्यक्रमांनी यात्रा होणार आहे.
शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या यात्रेला कोरोनामुळे दोन वर्षे खंड पडला होता, परंतु या वर्षी यात्रा होत असल्याने भाविकांमध्ये आनंदाचे, उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सर्व जाती,धर्मातील नागरिक एकोप्याने यात्रा उत्साहात साजरी करतात हे मालवंडी गावाचे अखंडित वैशिष्ट्य राहिले आहे.