गोरगरीबांच्या हक्काच्या घरांचे स्वप्न साकारले जात असल्याचे अधिक समाधान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

सिंधी कॉलनी येथे पट्टेवाटप कार्यक्रमात अनेक सिंधी बांधव भावूक

B1न्यूज मराठी नेटवर्क

स्मार्ट शहरासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करू – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

नागपूर : गोरगरीबांच्या हक्काच्या घरांचे स्वप्न साकार होत असल्याचे समाधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. नागपूरच्या प्रतापनगर येथील सिंधी कॉलनीमध्ये पार पडलेल्या पट्टेवाटप कार्यक्रमात झोपडपट्टीधारकांना त्यांच्या नावाचे मालकीहक्काचे पट्टे प्रदान करण्यात आले. मागील ४० वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे मार्गी लागला आहे. हा यशस्वी पॅटर्न आता संपूर्ण राज्यभर राबवण्यात येणार आहे.

फाळणीच्या काळात निर्वासित म्हणून नागपूर व इतर शहरांत वास्तव्यास आलेल्या सिंधी बांधवांना आता त्यांच्या राहत्या जागेची फ्रि-होल्ड मालकी मिळाली आहे. केवळ पट्टा नव्हे तर त्यांच्या हक्काचा सन्मान देत असल्याची भावना मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली. यामुळे आता पट्टेधारक कायदेशीर मालक झाले असून आर्थिक अडचणीच्या वेळी बँकांकडूनही त्यांना मदत मिळू शकणार आहे.

नागपूरमधील झुडपी जंगलांचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्नही न्यायालयीन लढ्यानंतर मार्गी लागला असून, कच्च्या घरधारकांना पक्की घरे मिळावीत यासाठी ‘सर्वांसाठी घरे’ व ‘प्रधानमंत्री आवास योजना’ प्रभावीपणे राबवली जात आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हा प्रश्न अत्यंत कुशलतेने सोडवल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांचे कौतुक केले. नागपूरला स्मार्ट शहरासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा – क्रिडांगणे, उद्याने, बाजारपेठा, भाजीमार्केट, सक्षम परिवहन व्यवस्था, पाणीपुरवठा व सांडपाणी व्यवस्थापन – शहरात विकसित केल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात मालकीहक्काचे पट्टे वितरित करण्यात आले तसेच महापालिकेच्या ‘एनएमसी स्मार्ट मित्र’ (AI मित्र) डिजिटल हेल्पडेस्कचे लोकार्पण करण्यात आले. हा कार्यक्रम हजारो कुटुंबांच्या जीवनात सुरक्षितता, स्थैर्य आणि सन्मान घेऊन आला आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या