निवडणूक तयारीला वेग : आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी आज मतदान यंत्रे, मत मोजणी ठिकाणाची केली पाहणी

0

सोलापूर महानगरपालिका – सार्वत्रिक निवडणूक 2025

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीत पार पाडण्यासाठी महानगरपालिकेकडून तयारीला वेग आला असून आज आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी शहरातील महत्त्वाच्या मतमोजणी ठिकाणांची सखोल पाहणी केली.

निवडणूक निर्णय अधिकारी १ ते ८ कार्यालयांची पाहणी,निवडणूक प्रक्रियेचा मुख्य आधार असलेल्या निर्णय अधिकारी कार्यालयांसाठी योग्य जागेची निवड, विजेची सोय, बैठकीची जागा, दस्तऐवज ठेवण्यासाठी सुरक्षित कक्ष, आयटी सुविधा, सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेचा डॉ.ओम्बासे यांनी प्रत्यक्ष आढावा घेतला. निर्णय अधिकाऱ्यांना अडचणीविना काम करता यावे यासाठी तत्काळ सुधारणा करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

ईव्हीएम संचयनाची कडक सुरक्षा व्यवस्था तपासली
मतदान यंत्रे (EVM – VVPAT) सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक स्ट्राँग रूमची क्षमता, सीसीटीव्ही कव्हरेज, डबल लॉकिंग सिस्टम, पोलिस बंदोबस्त, नियंत्रण कक्ष, प्रवेश-निर्गम मार्ग, अग्निशमन उपकरणे, 24×7 सुरक्षा या सर्व गोष्टींची आयुक्तांनी सखोल तपासणी करून आवश्यक निर्देश दिले. सुरक्षितता ही सर्वोच्च प्राधान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.मतमोजणी केंद्रांची तयारी
मतमोजणी दिवशी मोठी व्यवस्था उभारावी लागणार असल्याने मतमोजणी केंद्रांतील टेबल मांडणी, उमेदवार प्रतिनिधींसाठी स्वतंत्र जागा, मीडिया गॅलरी, आयटी कक्ष, प्रिंटर, वाय-फाय, पोलिस बंदोबस्त, आपत्कालीन व्यवस्था, पार्किंग यांचेही नियोजन आयुक्तांनी पाहून घेतले. मतमोजणीदरम्यान कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी योजनेला अधिक काटेकोर करावं, असे त्यांनी सुचवले. नॉर्थकोट प्रशाला, नूमवि प्रशाला, रामवाडी गोदाम आणि सिंहगड कॉलेज येथे पाहणी या ठिकाणी मतदान यंत्रे , मत मोजणी आणि मतदान कर्मचारी कक्ष, मार्गदर्शक फलक,पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, प्रकाशव्यवस्था, जनरेटर, इंटरनेट सुविधा या सर्वांचा बारकाईने आढावा घेतला. प्रत्येक निवडणूक दिनी नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये याकडे लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या.

या पाहणीदरम्यान अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, सहाय्यक आयुक्त गिरीष पंडित, नगर अभियंता सारिका आकूलवार, अंतर्गत लेखापरीक्षक राहुल कुलकर्णी, ओमप्रकाश वाघमारे, प्रदीप निकते, संदीप भोसले, गणेश कोळी आदी अधिकारी उपस्थित होते. डॉ. सचिन ओम्बासे यांनी सर्व विभागांनी समन्वय ठेवून निवडणूक तयारी अधिक सक्षम करण्याचे निर्देश दिले. नागरिकांनी मतदान करून लोकशाहीला बळकट करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या