सोलापूर जिल्हा सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनात विभागात अव्वल

0

राज्यपालांकडून जिल्हाधिकारी व सैनिक कल्याण अधिकाऱ्यांचा सत्कार

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर, दि. १० : सैनिकांच्या पुनर्वसनासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांच्या निधी संकलनात सोलापूर जिल्ह्याने राज्यात सर्वोच्च कामगिरी केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या दिनांक १० डिसेंबर २०२४ च्या निर्णयानुसार सशस्त्र सेना ध्वजदिन निधी २०२४ साठी सोलापूर जिल्ह्यासाठी रूपये १ कोटी ७२ लाख इतका इष्टांक निश्चित करण्यात आला होता. मात्र जिल्ह्याने रूपये २ कोटी १७ लाख १५ हजार ४७० इतकी रक्कम संकलित करून १२६.२५ टक्के उद्दिष्टपूर्ती साध्य केली व पुणे महसूल विभागात अव्वल स्थान प्राप्त केले.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल आज राजभवन, मुंबई येथे आयोजित राज्यस्तरीय ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ कार्यक्रमात जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, ध्वजदिन निधी कल्याण समिती कुमार आशीर्वाद आणि जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर मिलिंद देवदत्त तुंगार (निवृत्त) यांचा मा. राज्यपाल श्री आचार्य देवव्रत यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.

ही बाब सोलापूर जिल्ह्यासाठी अत्यंत गौरवाची व अभिमानास्पद असून, सैनिक कल्याणासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांचे हे राज्यस्तरीय मान्यतेचे प्रतीक ठरत आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या