जेष्ठ संपादक राजा माने यांची नागपुरात विधानभवनात अविनाश सोलवट यांची भेट
B1न्यूज मराठी नेटवर्क
नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खाजगी सचिव अविनाश सोलवट यांची भेट संपादक, माध्यम तज्ज्ञ व राजकीय विश्लेषक राजा माने यांनी विधानभवनातील त्यांच्या दालनात घेतली. अनेक वर्षांपासून चालत आलेला हा त्यांचा परंपरागत औपचारिक व सौहार्दपूर्ण भेटीचा क्रम यंदाही कायम राहिला.
या भेटीदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे माजी संदर्भ व जनसंपर्क प्रमुख तसेच पत्रकारांचे जिवलग मित्र स्वर्गीय संजय देशमुख यांच्या आठवणी दोघांनी उजाळ्या दिल्या. संजय देशमुख यांचे अकाली निधन हा पत्रकारिता व राजकीय वर्तुळासाठी मोठा धक्का असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
राजा माने हे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र, मुंबई तसेच प्रतिबिंब प्रतिष्ठान, मुंबईचे संस्थापक अध्यक्ष असून, शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी समिती, महाराष्ट्र शासनाचे सदस्य आहेत.




