वृक्ष संवर्धन समितीने केला पर्यावरण प्रेमी चिमुकल्यांचा सत्कार

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शीतील वाणी प्लॉट येथील बाल चमुंनी अगळ्या वेगळ्या प्रकारे होळी साजरी करुण एकप्रकारे थोरा मोठ्यांच्या समोर तसेच समाजासमोर एक आदर्शच उभा केला आहे.या बालकांनी होळी साठी झाडांची मोठी लाकड न वापरता परिसरातील कचरा तसेच काट्या कुट्या गवरीची तुकडे वापरुन होळी साजरी केली.तसेच होळी च्या समोर सुंदर अशी रांगोळी घालुन त्यावर ‘झाडे लावा झाडे जगवा’ हा संदेश लिहला.चिमुल्यांच्या या कृतीच कालदिवस भर सोशल मेडियावरही बरच कौतुक करण्यात येत आहे.
या बाल वृक्ष प्रेमींच पर्यावरन विषयी असलेले प्रेम वाढावे तसेच त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणुन बार्शीतील वृक्ष संवर्धन समिती कडुन या सर्व बालकांचा शालेय उपयुक्त साहित्य भेट देवुन सन्मान करण्यात आला. या वेळी वाणी प्लॉट येथील नागरिक व वृक्ष संवर्धन समितीचे सदस्य उपस्तिथ होते.
या वेळी पत्रकार गणेश गोडसे, वृक्ष संवर्धन समितीचे अध्यक्ष उमेश काळे, डॉ.सचिन चव्हाण, वृक्ष संवर्धन समितीच्या महिला अघाडीच्या जिल्हा अध्यक्षा सायरा मुल्ला, सचिन शिंदे, राहुल तावरे, राणाप्रताप देशमुख, अक्षय घोडके, सुनिल फल्ले, गणेश रावळ, सौदागर मुळे, सुमित खरुंगळे, सागर लोखंडे, रेखा सुरवसे, अनुसया आगलावे, कोमल वाणी, माधुरी वाणी, आशादेवी स्वामी, नंदिनी गवसाने , शारदा चव्हाण, रेणुका गळीतकर, दीपाली देशमुख , सुजाता सरवदे, प्रशांत काळे , राम माने, भाऊसाहेब गळीतकर,पुरुषोत्तम वाघूलकर, रणजित कोठावळे आदी उपस्तिथ होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस गणेश गोडसे, डॉ.सचिन चव्हाण, सुनिल फल्ले, सायरा मुल्ला, गणेश रावळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आभार रेखा विधाते यांनी मानले.