पत्रकार गणेश गोडसे यांना एजेएफसी राष्ट्रीय पत्रकार संघटनेचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहिर

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी येथील दैनिक पुढारीचे पत्रकार गणेश गोडसे यांना एजेएफसी या राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या वतीने राज्यात पत्रकारीतेमध्ये उल्लेखनीय कार्य केल्यामुळे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे अशी माहिती एजेएफसीचे राष्ट्रीय अध्यक्ष यासीन पटेल व सचिव बाळकृष्ण कासार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
रविवार दि. २७ मार्च २०२२ रोजी सायंकाळी चार वाजता मालाड (मुंबई) येथे मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे. नवीनचंद्र सोष्टे स्मृति राज्य पुरस्कार सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचे दैनिक पुढारीचे पत्रकार गणेश गोडसे यांना जाहीर झाला आहे. तर दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर स्मृती राज्य पुरस्कार २०२२ हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी अभिमन्यू लोंढे, नानासाहेब जोशी स्मृती राज्य पुरस्कार सातारा जिल्ह्यातील कराड येथील अतुल होनकळसे, मधुकर लोंढे ससेमिरा ग्रामीण वार्ताहर स्मृती राज्य पुरस्कार अकोला जिल्ह्यातील अकोट येथील राहूल कुलट, शरददादा बोरकर स्मृती राज्य पुरस्कार रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथील युयुत्सु आर्ते, तर जीवनगौरव पुरस्कार रायगड जिल्ह्यातील पनवेल येथील गणेश कोळी यांना जाहीर करण्यात आले आहेत.
भारतातील पहीली राष्ट्रीय पत्रकार मित्र संघटना एजेएफसी ही द्विदशकाच्या दिशेने वाटचाल करत देशातील प्रत्येक जिल्ह्यात आपला विस्तार करत आहे. हा विस्तार वाढविताना समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणा-यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याच्या उद्देशाने संघटनेकडून राज्यातील पत्रकारांना सन्मानित करण्यात येते.
आजपर्यंत पत्रकार गणेश गोडसे यांना अणेक पुरस्कार प्राप्त झाले असुन त्यामधील काही पुरस्कार असे: –
1) विजय प्रताप युवा मंच बार्शी तालुका. प्रा.साहेबराव देशमुख-2012-13
2) भ्रष्टाचार निर्मुलन जन संघटना,महाराष्ट्र राज्य यांचा राज्य स्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार -2015
3) ‘पांगरीत मुलीच्या जन्माचे वाजत गाजत स्वागत ‘ या दै.पुढारीत प्रकाशित झालेल्या वृत्ताची दखल घेऊन ग्रामविकास व महिला बालविकास खात्याच्या मंत्री पंकजाताई मुंढे यांनी पत्र पाठवुन विशेष अभिनंदन केले होते-2015
4)माळशिरस तालुका पत्रकार, संघाकडुण गौरव-2016
5) राजमाता प्रतिष्ठाण,महाराष्ट्र राज्य यांचा राज्यस्तरीय
राजमाता आदर्श पत्रकारीता पुरस्कार -2016
6) अक्कलकोट ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने सन्मानित-2016
7) राजयोग व व्यसनमुक्ती केंद्राच्या वतीने पत्रकारितेमधील योगदानाबद्दल सन्मानीत-2017
8) नक्षत्रांचे देणं काव्यमंचच्या वतीने आदर्श पत्रकार पुरस्कारांने सन्मानित-2017
9) पिंपरी(सा) येथे स्थानिक विविध मंडळे व ग्रामस्थांच्या वतीने जिल्हा अधिकारी रमेश घोलप यांच्या हस्ते सन्मानीत-2017
10)सोलापूर जिल्हा रहिवाशी संघटना,महाराष्ट्र राज्य
आदर्श पत्रकारिता पुरस्कार-2018-19
11) कोविड योद्धा पुरस्कार-2019
12)पत्रकारीता बार्शी आयकाॅन पुरस्कार-2019
13)वृत्तपत्र विक्रेता संघटनेचा गुणगौरव पुरस्कार-2020
14) राज्यस्तरीय दलित मित्र आदर्श पत्रकार गौरव पुरस्कार-2021
15) डाॅ. कुन्ताताई नारायण जगदाळे जीवनगौरव पुरस्कार-2022,आदी ईतर अणेक पुरस्कार
16) भारत विकास परिषदेचा सेवा पुरस्कार – 2022