बार्शी मध्ये रंगणार अठरावी बालनाट्य राज्य स्पर्धा…

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे याहीवर्षी बालनाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या वर्षी होणाऱ्या 18 व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे यजमानपद बार्शीला मिळाल्याने बार्शी मध्ये नाट्य रसिकांसाठी चांगली मेजवानी आहे. सदरील बालनाट्य स्पर्धा बार्शी येथील यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक भवन या ठिकाणी दिनांक 20 मार्च 2022 ते 23 मार्च 2022 या कालावधीमध्ये होणार आहेत. या स्पर्धेमध्ये विविध जिल्ह्यांतून 21 संघांचे नाट्य सादरीकरण होणार आहे. प्रथम फेरीतील विजेत्या संघांची दुसऱ्या फेरीसाठी निवड करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.
बार्शी येथील कलायात्री सांस्कृतिक व सामाजिक बहुउद्देशीय संस्थेकडे या स्पर्धेचे यजमानपद मिळाले असून, या बालनाट्य स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष आणि स्पर्धा समन्वयक दादाराव (प्रवीण) गाढवे, सांस्कृतिक सेलच्या जिल्हाध्यक्षा कविता कदम, समन्वयक मंजुषा काटकर, प्रविण मुल्ला, अतिश पालखे, गणेश इंगोले, अबोली दिक्षित-पालखे, परमेश्वर चांदणे, अंजली पवार, गजेंद्र जाधव, गणेश रजपूत आदी परिश्रम घेत असल्याचे स्पर्धा प्रसिद्धी प्रमुख धिरज शेळके यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.