गाडेगाव येथे लोकसहभागातून उभारला सौ. अनुश्रीताई आनंद भिडे जल शुद्धीकरण प्लांट स्वराज्य प्रतिष्ठान व स्नेहग्राम यांचा संयुक्त प्रकल्प

0

“स्वराज्य प्रतिष्ठानच्या युवकांनी लोकसहभागातून उभारलेल्या या प्रकल्पाचे कौतुक करत याचा आदर्श इतर सामाजिक संस्थांनी घ्यावयास हवा”
सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी तालुक्यातील गाडेगाव येथे स्नेहग्राम व स्वराज्य प्रतिष्ठान यांच्या वतीने उभारलेल्या सौ. अनुश्रीताई आनंद भिडे जलशुद्धीकरण प्लांटचे लोकार्पण स्नेहालय संस्थेचे अध्यक्ष संजय गुगळे व प्रिसिजनचे जनसंपर्क अधिकारी माधव देशपांडे यांचे हस्ते करण्यात आले.
गाडेगाव येथील स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त जमा वर्गणीतून ग्रामस्थांसाठी जलशुद्धीकरण प्लांट उभारण्याचे ठरवले. त्यानुसार प्लांटच्या एकूण रक्कमेपैकी 40 टक्के रक्कम वर्गणीतून जमा केली व उर्वरित 60 टक्के रक्कम स्नेहग्रामने दिली. यासाठी स्नेहग्रामने पुढाकार घेऊन ठाण्यातील निवृत्त बँक अधिकारी श्रीम. अनुश्रीताई आनंद भिडे यांनी स्नेहग्रामच्या वतीने 60 टक्के सहभाग रक्कम दिली. त्यानुसार सुमारे 1 लाख 15 हजार किमतीचा 250 लिटरचा जलशुद्धीकरण प्लांट बसण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष स्नेहालय संस्थेचे वरिष्ठ संचालक अनिल गावडे होते. याप्रसंगी बार्शी तालुका पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे, स्नेहग्रामचे महेश निंबाळकर, उद्योगपती प्रशांत पैकेकर, उद्योजक बाबासाहेब शेख, बार्शी जनता टाइम्सचे संपादक संतोष सूर्यवंशी, पत्रकार गणेश गोडसे, उपसरपंच धोंडीराम नागणे, जेष्ठ साहित्यिक शब्बीर मुलाणी, पिंटू नायकोडी, बार्शी टाइम्सचे दिनेश मेटकरी व अपर्णा दळवी, जयवंतराव पाटील, नागनाथ पाटील, चंद्रकांत जगताप, सुरेश जाधव, पोलीस कर्मचारी समीर पठाण, तलाठी ब्रह्मनावत व ग्रामसेविका सोनवणे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी संजय गुगळे यांनी शुध्द पाण्याचे महत्व विषद करत, अबाल वृध्दांपासून गावातील सर्व ग्रामस्थांनी या जलशुध्दीकरण प्लान्टचा उपयोग करुन घ्यावा असे आवाहन केले. तर सदरील जलशुध्दीकरण प्रकल्प निरंतर चालू राहून भविष्यात याचा वर्धापन दिन साजरा करण्याची संधी मिळावी अशी आशा प्रिसिजनचे माधव देशपांडे यांनी व्यक्त केली. याचबरोबर प्रशांत पैकेकर, पत्रकार संतोष सुर्यवंशी, गणेश गोडसे आदींनी मनोगते व्यक्त केली. प्रास्ताविक राहुल भालके यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गणेश नागणे, गजानन बोराडे, प्रमोद जाधव, मनोज काळे, संतोष भालके व सागर जगताप यांनी परिश्रम घेतले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या