ज्योतिर्लिंग कसबे यांच्या वाढदिवसानिमित्त कामगारांच्या श्रमाला युनिव्हर्सल स्वरूप

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी येथील सामाजिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असणारे, सर्वसामान्य जनतेला सोबत घेऊन सर्वधर्मीय कार्य करणारे समाजसेवक, बार्शी नगरपालिकेचे माजी बांधकाम सभापती ज्योतिर्लिंग कसबे यांच्या वाढदिवसानिमित्त, वाढदिवसाच्या अनाठायी खर्चाला फाटा देत, ज्योतिर्लिंग बप्पा कसबे मित्र परिवाराच्या वतीने कामगारांसाठी ई श्रम कार्ड व युनिव्हर्सल पासचे मोफत वाटप करण्याचा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. या शिबिरामध्ये 741 नागरिकांना ई श्रम कार्ड व युनिव्हर्सल पासचे मोफत वाटप करण्यात आले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्मार्ट अकॅडमीचे संचालक सचिन वायकुळे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष रमेश पाटील, माजी उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले, सोलापूर जनता बँकेचे संचालक मुकुंद कुलकर्णी साहेब , कडघंची साहेब , मदन गव्हाणे, मनीष चव्हाण, मुन्ना शेटे, भारत पवार, विशाल बागल, आकाश चव्हाण, विविध संघटनेचे पदाधिकारी, पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्वसामान्य नागरिकांना ई श्रम कार्ड आणि युनिव्हर्सल पास काढण्यासाठी 100 ते 200 रुपये खर्च करावे लागतात. एवढे पैसे खर्च करून देखील नागरिकांना वारंवार हेलपाटे घालून देखील त्यांचे काम वेळेवर होत नाही. मजूर कामगार व सर्वसामान्य नागरिकांना त्यांचा खर्च व वेळ वाचविण्यासाठी हे शिबिर घेण्यात आले असून, सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आम्ही नेहमीच वेगवेगळ्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडवित आलेलो आहोत आणि यापुढेही असेच समाजकार्य करीत राहू असेही ज्योतिर्लिंग कसबे यांनी यावेळी सांगितले.
आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून ज्योतिर्लिंग कसबे यांनी बार्शी शहर व तालुक्यामध्ये हरितक्रांती घडवून आणणाऱ्या वृक्षसंवर्धन समितीला पाच हजार एक रुपयाचा देणगीचा धनादेश यावेळी वृक्ष संवर्धन समितीच्या सदस्यांना देण्यात आला.
ज्योतिर्लिंग बप्पा कसबे मित्र परिवाराच्या वतीने कामगारांना खऱ्या अर्थाने त्यांच्या श्रमाला, युनिव्हर्सल स्वरूप देण्याचे कार्य या शिबिराच्या माध्यमातून झाले असल्याने, या शिबिराचे व अनोख्या उपक्रमाचे कौतुक संपूर्ण बार्शी शहर व तालुक्यातून होत आहे. वाढदिवसाच्या कार्यक्रमास सर्व पक्षीय मंडळी उपस्थित होती. यावेळेस मा नगराध्यक्ष विश्वास भाऊ बारबोले, रमेश अण्णा पाटील, योगेशजी सोपल, नागेश अण्णा अक्कलकोटे , दिपक आबा राऊत , शरद काका फुरडे , विजय चव्हाण सर, मदन दादा गव्हाणे, रितेश अण्णा वाघमारे, मनीष चौहान, संदीप बरांगुळे, मुन्ना शेटे, किरण देशमुख सर, सर्व सामजिक संघटना चे पदाधिकारी , नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी ज्योतिर्लिंग बप्पा कसबे मित्र परिवाराचे आनंद अस्वरे, बंटी शिवशरण, मुन्ना पठाण, रोहन आण्णा कसबे,मूनवर शेख, सबिरअली शेख, अमोल अवाशंख, सोनू जगताप, राम खळदकर, शुभम शेटे, हृषिकेश दुधाळ, समाधान पाटील, अनिकेत अस्वरे, स्वप्नील कांबळे, सोनू पोफळे, नागराज कांबळे, पंकज गायकवाड , अरबाज शेख , चेतन कसबे आदींनी परिश्रम घेतले.