बार्शीच्या आनंद शेलार यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) निमंत्रण साखळी सामन्यांसाठी सोलापूर वरीष्ठ संघाच्या प्रशिक्षकपदी निवड

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शीतील भगवंत क्रिकेट असोसिएशनचे प्रशिक्षक आनंद शेलार यांची महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशनच्या निमंत्रण साखळी सामान्यांसाठी सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वरिष्ठ संघासाठी प्रमुख प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आलेली आहे.सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन चे सचिव श्री चंद्रकांत रेम्बर्सु यांच्याकडून त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. त्यावेळी सोलापूर जिल्हा क्रिकेट संघटनेच्या निवड समितीचे चेअरमन उदय डोके, सुनील मालाप, संजय मोरे, किरण पवार, उमेश मामड्याल, श्री. गोटे, के.टी.पवार आदी उपस्थित होते.कोच आनंद शेलार हे स्वतःदेखील यापूर्वी सोलापूर जिल्हा वरिष्ठ संघाकडून हे सामने खेळले आहेत. तसेच ते 2021 च्या वर्ल्ड सेफ्टी सिरीजमध्ये वेस्ट इंडिज संघाचे प्रशिक्षक राहिले आहेत. कमी कालावधीत प्रशिक्षण क्षेत्रात खूप मोठे नावलौकिक कमावले असून महाराष्ट्रातील नामवंत प्रशिक्षकांमध्ये त्यांची गणना केली जाते. त्यामुळे या साखळी सामन्यांमध्ये सोलापूर जिल्ह्याचा संघ सर्वोत्कृष्ट कामगिरी करेल, अशी आशा व्यक्त होत आहे.महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशन आयोजित निमंत्रण साखळी सामने कोल्हापूर येथे 7 मार्च पासून सुरू होत आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या संघांमध्ये खेळल्या जाणाऱ्या या सामन्यांमधून महाराष्ट्राच्या रणजी संघाचे खेळाडू निवडले जातात. त्यामुळे या सामन्यांना अनन्यसाधारण महत्व प्राप्त आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या