महापरिनिर्वाण दिन | पी. बी. ग्रुपतर्फे दीप प्रज्वलन व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन
B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला प्रबुद्ध भारत तरुण मंडळ (पी.बी. ग्रुप) तर्फे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आंबेडकर चौकात प्रा. सुधीर घव्हाणे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून डॉ. आंबेडकरांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे आणि जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली.
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद (दादा) चंदनशिवे, जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष अनिल बनसोडे, अविनाश भडकुंबे, चंद्रकांत (चाचा) सोनवणे, श्रीमंत (आप्पा) जाधव, बापू जाधव, सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे, कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे, अमोल कांबळे, श्यामराव गांगर्डे, ॲड. विशाल मस्के, तसेच पी.बी. ग्रुपचे अध्यक्ष बाबा गायकवाड, उमेश रणदिवे, संतोष चंदनशिवे, नितीन बंदपट्टे, आदित्य चंदनशिवे, प्रतीक चंदनशिवे, धन्ना कापुरे, अमित माने, गुड्डू शिंदे, धोंडीबा कापूरे, चंद्रकांत निंबर्गिकर, नाना कापुरे, अनिस सय्यद, सिद्धांत सुर्वे, धीरज वाघमोडे, रवी सकट, गौतम शिंदे, सुरज गायकवाड, कुमार सांगे, आप्पा दोडमनी, लखन चंदनशिवे, मेघराज गायकवाड, खाजाप्पा निंबर्गिकर, बाळू शिंदे, दत्ता कांबळे, श्रीपती गायकवाड, तुषार गंटोल, बाळराज जाधव, विशाल मैंदर्गिकार, सिद्धांत तळभंडारे, प्रथमेश सुरवसे, सुमित चंदनशिवे, अमोल बनसोडे, कबीर इंगळे, भीमा मस्के, शुभम आंगरे, धीरज साबळे, मारुती सकट, गणेश वाघमारे, शिरीष गायकवाड, मनीष साळवे, वैभव लोखंडे, यशराज गायकवाड, दीपक भंडारी, रोहन बागले, नागेश कांबळे, सचिन बागले, राहुल बागले यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉ. आंबेडकरांनी दिलेल्या प्रबोधन, समानता आणि सामाजिक न्यायाच्या विचारांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.




