नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा १३ डिसेंबरला जिल्ह्यात १५ केंद्रांवर ३ हजार २२४ विद्यार्थी बसणार

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

रायगड -अलिबाग : जवाहर नवोदय विद्यालय, पीएमश्री स्कूल, निजामपूर येथील इयत्ता सहावीकरिता प्रवेश परीक्षा शनिवार, १३ डिसेंबर २०२५ रोजी रायगड जिल्ह्यातील एकूण १५ तालुक्यातील परीक्षा केंद्रांवर आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी ३ हजार २२४ विद्यार्थी बसणार असून ८० जागांसाठी निवड प्रक्रिया होणार आहे, अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत राघमवार यांनी दिली.

परीक्षेसाठी पात्र विद्यार्थ्यांची नावे, रजिस्ट्रेशन क्रमांक तसेच ओळखपत्रे ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आली आहेत. उमेदवारांनी खालील अधिकृत संकेतस्थळांवरून प्रवेशपत्र डाउनलोड करावेत.
https://cbseitms.rcil.gov.in/nvs/AdminCard/AdminCard

विद्यार्थी रजिस्ट्रेशन क्रमांक आणि जन्मतारीख हीच ओळखपत्र डाउनलोड करण्यासाठी आवश्यक पासवर्ड माहिती असेल, असेही प्राचार्यांनी सांगितले आहे.

सर्व विद्यार्थ्यांनी १३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता नियोजित परीक्षा केंद्रावर वेळेपूर्वी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. परीक्षेबाबत कोणतीही अतिरिक्त माहिती हवी असल्यास संतोष चिंचकर (९८८१३५१६०१) किंवा अर्जुन गायकवाड (९८६२७९३६४०) यांच्याशी संपर्क साधावा.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या