नव्याने कार्यक्रम जाहीर झालेल्या नगरपरिषदा व जागांसाठी 20 डिसेंबर रोजी मतदान

0

जिल्ह्यातील सर्व नगरपालिका मतदानाची मतमोजणी 21 डिसेंबर रोजी होणार

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर : राज्य निवडणूक आयोगाने स्थगित करण्यात आलेल्या नगरपरिषदा व जागांसाठी नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. यात नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या टप्प्यापासून पुढील प्रक्रिया पार पडणार आहे. नव्याने उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नाही. नव्याने कार्यक्रम जाहीर झालेल्या नगरपरिषदा व जागांसाठी मतदानाची तारीख 20 डिसेंबर 2025 असणार आहे. तर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ अंतर्गत दि. ०२/१२/२०२५ झालेल्या व दि. २०/१२/२०२५ होणाऱ्या निवडणुकांची मतमोजणी व निकाल मा. उच्च न्यायालय व राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी जाहीर करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपालिका प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त योगेश डोके यांनी दिली.

राज्य निवडणूक आयोग , महाराष्ट्र यांनी दि. ०४/११/२०२५ रोजी घोषित केलेल्या कार्यक्रमानुसार राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायती यांच्या सदस्य व अध्यक्ष पदाच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील नगरपरिषद बार्शी, पंढरपूर, अक्कलकोट, अकलूज, सांगोला, मंगळवेढा, करमाळा, कुडूवाडी, मैंदर्गी, दुधनी, मोहोळ व नगरपंचायत अनगर असे एकूण १२ ठिकाणी दि. ०२/१२/२०२५ रोजी मतदान प्रस्तावित होते.

निवडणूक नियमातील तरतूदीनुसार नामनिर्देशनपत्रांची छाननी झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निर्णयाविरोधात व्यथित उमेदवारांनी जिल्हा न्यायालयात अपील दाखल केले. यामध्ये मंगळवेढा नगरपरिषद व अनगर नगरपंचायत येथे अध्यक्ष पदाच्या उमेदवाराने अपील केले.

नगरसेवक पदासाठी मैंदर्गी येथे एक जागा, सांगोला येथे दोन जागा, मोहोळ येथे दोन जागा , मंगळवेढा येथे एक जागा, बार्शी येथे एक जागा व पंढरपूर येथे एक जागेसाठी अपील करण्यात आले होते. या अपिलांचा निकाल दि. २२/११/२०२५ पर्यंत प्राप्त न झाल्याने राज्य निवडणूक आयोगाच्या दि. २९/११/२०२५ रोजीच्या आदेशाने सदर जागांची निवडणूक स्थगित करण्यात आली. मंगळवेढा व अनगर येथे अध्यक्ष पदाबाबत अपील झाल्याने तेथे संपूर्ण नगरपरिषदेच्या निवडणूक प्रक्रियेस स्थगिती देण्यात आली होती, असे डोके यांनी सांगितले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या