सुयश विद्यालय, बार्शी येथे क्रीडा महोत्सवाची उत्साहात सुरुवात

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी, दि. 30 नोव्हेंबर 2025 : सुयश विद्यालय, बार्शी येथे क्रीडा महोत्सवाचा भव्य शुभारंभ शनिवारी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. उद्घाटन समारंभासाठी माननीय पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे (बार्शी शहर), सुरज ढमढेरे, पोलीस कॉन्स्टेबल बालाजी नागरगोजे तसेच संस्थेचे संस्थापक नलवडे उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांच्या स्वागतासाठी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या आकर्षक एरोबिक्स नृत्यप्रस्तुतीने झाली. त्यानंतर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून महोत्सवाची औपचारिक सुरुवात करण्यात आली.

आपल्या मनोगतात बोलताना पोलीस निरीक्षक कुकडे साहेबांनी सुयश विद्यालयात क्रीडा क्षेत्राला दिले जाणारे महत्त्व पाहून आपण भारावून गेल्याचे सांगितले. तसेच विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत त्यांनी शकुंतला टर्फ ग्राउंडवर फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन करून क्रीडा महोत्सवाचा प्रारंभ केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा शिक्षक जाधव सरांनी केले, तर सूत्रसंचालन सौ. साखरे मॅडम यांनी कौशल्यपूर्णरीत्या पार पाडले. क्रीडा महोत्सव यशस्वी करण्यासाठी जाधव सर आणि सर्व सहशिक्षकांचे विशेष योगदान लाभले.

सुयश विद्यालयाच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाभावना, संघभावना आणि शिस्तीचे महत्त्व अधिक दृढ झाल्याचे पाहुण्यांनी नमूद केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या