उदापूर येथे अवैध दारूसाठ्यावर उत्पादन शुल्क विभागाचा छापा, 5 लक्ष 16 हजारांचा मुद्देमाल जप्त

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

चंद्रपूर, दि. २९ : नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तसेच जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या आदेशानुसार दिनांक 01 ते 03 डिसेंबर 2025 या कालावधीत दारूबंदी लागू असताना उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. विभागीय उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क नागपूर विभागाचे गणेश पाटील व अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क चंद्रपूर नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून मौजा उदापूर, तालुका ब्रह्मपुरी येथील ज्ञानेश्वर रामकृष्ण नाकतोडे या व्यक्तीने अवैधरित्या देशी व विदेशी दारूचा मोठ्या प्रमाणात साठा करून ठेवल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. त्यानुसार शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास भरारी पथकाने आरोपीच्या घरी छापा टाकला असता मोठ्या प्रमाणात अवैध दारूसाठा आढळून आला.

छापामारीत दोन लिटर क्षमतेच्या विदेशी दारूच्या 11 बाटल्या, 180 मिली क्षमतेच्या विदेशी दारूच्या 1927 बाटल्या, 90 मिली क्षमतेच्या विदेशी दारूच्या 225 बाटल्या, 90 मिली क्षमतेच्या देशी दारूच्या 200 बाटल्या. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 5 लक्ष 16 हजार 280 रुपये इतकी आहे.

ही कारवाई दुय्यम निरीक्षक सोमेश्वर गव्हारे यांच्या नेतृत्वाखाली जवान सुजित चिकाटे, संजय कुमार हरिणखेडे आणि सुकेशनी कारेकार यांनी केली. प्रकरणाचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक सोमेश्वर गव्हारे करीत आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या