मुंबई येथील सोलापूर युनिफॉर्म गारमेंट हेअर ला 3000 व्यापाऱ्यांची भेट सोलापूर करिता हे अभीमानास्पद- आमदार सुभाष देशमुख

0

या युनिफॉर्म फेअरला परराज्यातील जवळजवळ बाराशे तर परदेशातील दहा ते पंधरा गारमेंट व्यापाऱ्यांची सदिच्छा भेट

B1न्यूज मराठी नेटवर्क

मुंबई : येथील नेस्को एक्झिबिशन सेंटर मध्ये आयोजित युनिफॉर्म गारमेंट फेरला तीन दिवसात जवळजवळ 3000 गारमेंट व्यावसायिकांनी भेट दिली असून यात बाराशे हून अधिक इतर राज्यातील गारमेंट व्यावसायिक भेट दिली असून सोलापूर साठी हे घोषणा व असल्याचे प्रतिपादन माझी वस्त्रोद्योग मंत्री व आमदार सुभाष देशमुख यांनी सांगितले.

सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनच्या वतीने झालेल्या तीन दिवसीय फेअरच्या सेंड ऑफ कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य माढा चे सीईओ संजीव जयस्वाल तसेच मुख्य वित्त व्यवस्थापक अजय सिंग पवार , फेअर चेअरमन अजय रंगरेज, सचिव श्रीकांत अंबुरे, आदी उपस्थित होते.

या प्रदर्शनासाठी खास परदेशातील दहा ते पंधरा बायर्सनी भेट दिली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यामुळे सोलापूरचे नाव साता समुद्रा पलीकडे दर्जात्मक युनिफॉर्म साठी घेतले जाईल असे देशमुख म्हणाले.

150 हून अधिक स्टॉल धारक या फेअर मध्ये सहभागी झाले होते. या स्टॉलचे वैशिष्ट्य असे होते की हॉस्पिटल कार्पोरेट शालेय गणवेश स्पोर्ट्स सेक्युरिटी गार्ड्स हाऊसकीपिंग पर्यंतचे सर्व युनिफॉर्म गारमेंट प्रदर्शनात अवेलेबल होते. याबरोबरच ब्लेझर टाय शूज व सर्व पोशाखाना लागणाऱ्या आकर्षक प्रकारच्या बॅचचा प्रदर्शनात समावेश होता.

प्रत्येक युनिफॉर्म गारमेंट स्टॉलला कमीत कमी 200 तर जास्तीत जास्त 600 व्यापारी यांनी भेट दिली त्यामुळे प्रत्येकाला काम व्यवसाय भरघोस मिळेल अशी अपेक्षा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. याचे कारण सांगताना सोलापुरातील युनिफॉर्मचे कमी दर व दर्जात्मक कपडे तसेच मागील प्रदर्शनामुळे देखील या गारमेंट फेअरला प्रचंड प्रतिसाद मिळाले असल्यामुळे आम्ही समाधानी आहोत असे व्यापारी सांगताना दिसले.

कार्यक्रमाची प्रस्तावना फेअर चेअरमन अजय रंगरेज यांनी केले तर आभार श्रीकांत अंबुरे यांनी मानले तर सूत्रसंचालन अमित जैन व प्रकाश पवार यांनी केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या