जिल्हा क्रीडा पुरस्कारसाठी अर्ज करण्याचे आवाहन

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

पुणे : जिल्ह्याचा गौरव वाढविणारे गुणवंत खेळाडू तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडविणारे एक क्रीडा मार्गदर्शक यांना दरवर्षी जिल्हा क्रीडा पुरस्काराद्वारे सन्मानित केले जाते. या पुरस्कारांतर्गत एक मार्गदर्शक, एक महिला खेळाडू, एक पुरुष खेळाडू व एक दिव्यांग खेळाडू अशा चार प्रवर्गातून निवड केली जाणार आहे. पुरस्कारामध्ये रु. दहा हजार व प्रमाणपत्र तसेच सन्मानचिन्ह यांचा समावेश असेल.

पुणे जिल्ह्यातील मार्गदर्शक व खेळाडू यांचेकडून सन २०१९-२० ते २०२४-२५ या वर्षांसाठी अर्ज स्वीकारले जाणार असून विहित नमुन्यातील अर्ज दि. ५ डिसेंबर २०२५ पर्यंत उपलब्ध राहतील. परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याची अंतिम तारीख १० डिसेंबर २०२५ अशी आहे.

पुरस्कार अर्जासाठी अर्जदाराचे महाराष्ट्रात सलग १५ वर्ष वास्तव्य तसेच पुणे जिल्ह्याचे अधिवास प्रमाणपत्र अनिवार्य आहे. संबंधित खेळाडूने पुरस्कार वर्षासह मागील पाच वर्षांपैकी किमान दोन वर्षे मान्यताप्राप्त अधिकृत क्रीडा स्पर्धेमध्ये जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केलेले असणे आवश्यक आहे. एका जिल्ह्यात पुरस्कार मिळाल्यानंतर उमेदवार राज्यातील अथवा इतर जिल्ह्यातील पुरस्कारासाठी पात्र राहणार नाही. तसेच पूर्वी त्याच खेळात किंवा प्रवर्गात जिल्हा क्रीडा पुरस्कार मिळालेल्या व्यक्तीस त्याच खेळात पुन्हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार नाही.

अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, स.नं. १९१, विभागीय क्रीडा संकुल, मोझे हायस्कूल समोर, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, येरवडा, पुणे, संपर्क क्रमांक श्रीमती शोभा पालवे ८४४६६४६२२८, शिवाजी कोळी ७०२०३३०४८८, अश्विनी हत्तरगे ७३८७८८०४२७, मनिषा माळी ७३९१९६८१९२, मनिषा दिवेकर ९७६४३८५१५२ येथे संपर्क साधावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी कळविले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या