बार्शीतील आदर्श शिक्षक रामचंद्र इकारे यांची महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : सुलाखे हायस्कूल येथे कार्यरत असलेले कलाशिक्षक रामचंद्र इकारे यांची महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.यापूर्वी कोल्हापूर व पुणे विभागीय कार्याध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. विद्यार्थ्यांना कला क्षेत्रात आवड निर्माण व्हावी यासाठी विविध उपक्रम घेण्यात आले होते. तसेच कला शिक्षकांच्या अडचणी यांवर पाठपुरावठा करून अडचणीचं निवारण करण्याचे काम रामचंद्र इकारे यांनी केले. याच कामाची पावती म्हणून महासंघाच्या वतीने प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघाचे राज्य अध्यक्ष विनोद इंगोले (अमरावती), राज्य उपाध्यक्ष प्रल्हाद शिंदे-हस्तेकर (औरंगाबाद), सरचिटणीस प्रल्हाद साळुंखे(धुळे) आदींनी रामचंद्र इकारे यांना निवडीचे पत्र दिले व भावी कार्यकिर्दीस शुभेच्छा दिल्या.
त्यांच्या या निवडीबद्दल राज्यातील अनेक विभागीय पदाधिकारी , जिल्हाध्यक्ष तसेच सोलापूर जिल्हाध्यक्ष संजय पवार, सचिव सावता घाडगे, कोषाध्यक्ष शिवभूषण ढोबळे यांच्यासह बार्शी अध्यक्ष हरिदास कुंभार, दीपक माने यांसह अनेक कलाशिक्षकांनी अभिनंदन केले…!