बार्शीराजकीय

सुजाता डोळसे होणार वैरागच्या पहिल्या नगराध्यक्षा

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : वैराग नगरपंचायतीवर पहिल्या महिला नगराध्यक्षा होण्याचा मान सुजाता डोळसे यांना मिळणार आहे. नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने १३ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले आहे.
पहिल्या नगराध्यक्ष म्हणून विराजमान होण्याचा मान सुजाता संगमेश्वर डोळसे यांना मिळणार आहे. गुरुवारी मुंबई येथे झालेल्या आरक्षण सोडतीत वैराग नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण अनुसूचित जातीच्या महिलेसाठी आरक्षित झाले आहे. वैराग (ता. बार्शी) च्या पहिल्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये निरंजन भूमकर यांच्या नेतृत्वा खाली राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळविले आहे. भाजपला चार जागा मिळाल्या आहेत.

प्रभाग क्रमांक १३ मधून अनुसूचित जाती या प्रवर्गातून सुजाता डोळसे या निवडून आल्या आहेत. वैराग ग्रामपंचायतीच्या शेवटच्या सरपंच म्हणून सुजाता डोळसे यांनी काम पाहिले आहे.
नगरपंचायत निवडणूक झाल्यानंतर नगराध्यक्ष पदाचे पहिले आरक्षणही योगायोगाने अनुसूचित जातीच्या महिलेसाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या शेवटच्या सरपंच आणि नगरपंचायतीच्या पहिल्या महिला नगराध्यक्षा होण्याचा मान डोळसे यांना मिळाला मिळाला आहे. ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचे नेते निरंजन भुमकर यांचीच सत्ता होती. नगरपंचायत मध्येही भुमकर यांचीच सत्ता आल्याने नगराध्यक्ष पदाचा मान डोळसे यांनाच मिळणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button