उडान फाऊंडेशनच्या शिबिरात १८५ जणांचे रक्तदान , प्रजासत्ताक दिनी आयोजन

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असे समजले जाते. भविष्यात रक्ताची मागणी वाढली तर राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू नये, हीच गरज लक्षात घेऊन उडान फाउंडेशन बार्शी या सामाजिक संस्थेने दरवर्षीप्रमाणे प्रतिवर्षी ही बुधवार 26 जानेवारी 22 ला महारक्तदान शिबिराचे आयोजन केलेले होते. विशेष म्हणजे या शिबिरात जमा होणाऱ्या रक्तसाठ्याचा काही भाग गरीब,गरजु रुग्णा च्या उपचारासाठी सुपूर्द करण्यात येणार आहे. सामान्य नागरिकांकडून हा मदतीचा हात आहे. या रक्तदान शिबिरात 185 जणानी सहभाग घेतला.रक्तदात्याचा सत्कार व आभार उडान फाउंडेशनच्या वतीने व्यक्त करण्यात आले. या शिबिराचे रक्तसंकलन मल्लिकार्जुन ब्लड सेंटर सोलापूर यांनी केलेले आहे.तसेच या शिबिरास महिला व अपंग व्यक्तिनेही सहभाग नोंदवून हम भी कुछ कम नहीं असा आदर्श निर्माण केलेला आहे.
यावेळी रक्तदान शिबिरास बार्शी तालुक्याचे विद्यमान आमदार राजाभाऊ राऊत, शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर, बार्शी बार असोसिएशनचे अध्यक्ष अविनाश जाधव, नगरसेवक महेश जगताप, कयूम पटेल, लायन्स क्लब अध्यक्ष एडवोकेट विकास जाधव, वृक्षसंवर्धन समितीचे अध्यक्ष उमेश काळे, गणेश नान्नजकर, जय शिवराय प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय राऊत, छत्रपती ग्रुपचे अध्यक्ष अजय पाटील, किरण कोकाटे सर, आदिनी सदिच्छा भेट दिली. विशेष दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी माजी नगरसेवक शमशोद्दीन केमकर यांनी रक्तदान देऊन आदर्श निर्माण केला आहे. या कार्यक्रमास दर वर्षीप्रमाणे यंदाही मोफत पाणी पिण्याचे जार देण्यात आलेले आहेत.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उड़ान फाउंडेशनचे सल्लागार व बार्शी नगर परिषदेचे आरोग्य विभाग प्रमुख शब्बीर वस्ताद , इंनुस शेख अय्यूब शेख, अध्यक्ष इरफान शेख, उपाध्यक्ष जफर शेख व इलियास शेख, कार्याध्यक्ष शकील मुलानी सचिव जमील खान, खजिंनदार शोयब काझी, नगरपरिषदेचे माजी अभियंता समशेर पठाण, मोईन नाईकवाडी, तौसीफ बागवान, जिलानी शेख, साजन शेख, मोहसीन पठाण, हाजी राजू शिकलकर रॉनी सैय्यद, मुन्ना बागवान, समीर शेख, सलीम चाचा चौधरी, इरफान रियाज़ शेख, अल्ताफ़ शेख, जमीर तंबोली, रियाज बागवान, सादिक रेडियटर, मोहसीन दिल्लीवाले अकील मुजावर यांनी अथक परीश्रम घेतले.